Aditya Thackeray : गद्दारांना चांगले खाते मिळेल असे वाटले, पण मिळाला बाबाजीचा ठुल्लू

आता जिथे आहे तिथे आनंदाने राहा, मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा. (Aditya Thackeray)
Shivsena Leader Aditya Thackeray News jalgaon
Shivsena Leader Aditya Thackeray News jalgaonSarkarnama
Published on
Updated on

जळगांव : नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल, चांगले खाते मिळेल अशी तिकडे गेलेल्या गद्दारांना आशा होती. तुमच्याकडच्या गद्दारांना मंत्रीपद मिळाल्यावर चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात त्यांना मिळाला बाबाजीचा ठुल्लू, अशा शब्दात युवासेना अध्यक्ष (Aditya Thackeray)आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व बंडखोर आमदारांना टोला लगावला.

शिवसंवाद मोहिमेसाठी आदित्य ठाकरे आज (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात आले होते. पाचोरा येथील सभेत बोलतांना आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेसोबत गद्दारी करून हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. मंत्रीपद मिळेल चांगलं खाते मिळेल अशी अपेक्षा गद्दारांना होती. मात्र यांना काय मिळालं तर बाबाजीचा ठुल्लू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले की ५० थर लावून दहीहंडी फोडली. पन्नास थरांची दहीहंडी फोडली की पन्नास इतर काही घेतलं ? ५० खोके यांनी घेतले, मलाई यांनी खाल्ली मात्र सामान्य जनतेला काय मिळालं तर काहीच नाही.

Shivsena Leader Aditya Thackeray News jalgaon
राज्यपाल अचानाक गोपीनाथ गडावर : मुंडे समर्थक भारावले!

शिवसेनेला संपवण्याचे नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. गद्दार जेव्हा गोवहाटी आणि गोव्यामध्ये फिरत होते त्यावेळी ते स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेत होते. मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली.

आता जिथे आहे तिथे आनंदाने राहा, मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा, असे जाहीर आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले आहेत, हे सांगायला देखील ठाकरे विसरले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com