

Election Commission of India : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी मुंबईत काढलेल्या मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत असतानाच,
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतून ज्ञानेश कुमार यांच्याबाबत मोठीमागणी केली. त्यांनी राजीनामा देऊ नये, तर त्यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळात जे काही केले आहे, ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्यांनी केलेली कृती पूर्णपणे बेकायदेशीर होती. संविधानाच्या विरोधात त्यांनी कारभार केला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याचे तसेच संसदेने केलेल्या कायद्याचे उल्लंघन केले आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी केलेल्या विरोधातूनही हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी तब्बल १४ पत्रे लिहून मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेत असल्याची तक्रार केली आहे."
कायदा अगदी स्पष्ट आहे की, निवडणूक आयोगाने (Election Commission) एकमताने किंवा बहुमताने निर्णय घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांनी आता राजीनामा देऊ नये, तर त्यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि अत्यंत गंभीर आरोपांखाली कारवाई करण्यात आली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच आहे. स्वराज्य इंडिया, एआयएसएसने आंदोलनाची धार वाढवलेली आहे. काँग्रेस अन् डाव्यांच्या संघटनांनी देखील आंदोलनात जोरदार सहभाग घेतला आहे. युवक काँग्रेसने जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी मागितल्यानंतर ती नाकारण्यात आली आहे. त्याविरोधात युवक काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संपूर्ण देश बेकायदा निवडणुकांवर चालवता जात आहे. निवडणुका पुन्हा घेण्याची आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी खरगे यांनी केली. मुंबईत ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर घणाघात केला. एसआयआर प्रक्रिया रद्द करून, मतदान प्रक्रिया ही बॅलेज पेपरवर राबवण्याची मागणी केली. ज्ञानेश कुमारवरून संपूर्ण देशात घमासान सुरू असतानाच, पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून, फौजदारी कारवाईची सुरू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.