Congress : 30 मतदारसंघ काँग्रेसच्या रडारवर; 'घोळ' शोधण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्लॅन !

Congress : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मतदान प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत वाढलेले मतदान कसे वाढले याचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील 30 मतदारसंघाची निवड केली आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभ्यासासाठी कार्यकर्ते प्रशिक्षित करण्यात आले असून, ते मतदार याद्यांचा अभ्यास करून थेट मतदारांबरोबर संपर्क साधणार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मतदान प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत साधारण पाच महिन्यांचा कालावधी होता. लोकसभा निवडणूक मे मध्ये, तर विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात झाली. या दोन निवडणुकांदरम्यान तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त मतदार वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Harshwardhan Sapkal
Election Commission News : राहुल गांधी लोकसभेत बोलले अन् दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल!

त्याचप्रमाणे शिर्डी विधानसभेतील एका मतदान केंद्रांचा हवाला देत एकाच इमारतीमध्ये एक हजारपेक्षा जास्त मतदार असल्याचा जाहीरपणे आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. याबाबत त्यांनी लोकसभेतही प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. प्रोफेशनल काँग्रेसनेही आकडेवारीचा हवाला देत सातत्याने याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Harshwardhan Sapkal
Congress vice president quits : राहुल गांधी मुंबईत असताना विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का ; आता 'या' बड्या नेत्याने सोडला पक्ष!

याच पार्श्वभूमीवर वाढलेले मतदार शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 30 विधानसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते पाठवण्यात येतील. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने वापरलेल्या मतदारयाद्या या कार्यकर्त्यांजवळ देण्यात येतील.

मतदारसंघाचे काही विभाग करून हे कार्यकर्ते लोकसभेला नसलेल्या पण विधानसभेसाठी नाव समाविष्ट झालेल्या मतदारांचा शोध घेतील. त्यांच्याशी संपर्क साधतील. ज्या नावांचे मतदार मिळणार नाहीत, घरे सापडणार नाहीत, त्यांची हे कार्यकर्ते नोंद करतील. याशिवाय कार्यकर्त्यांना आणखी काही गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यावरही ते काम करणार आहेत.

हे 30 मतदारसंघ नेमके कोणते याबाबत काँग्रेसकडून गोपनियता बाळगण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांबरोबरच अगदी कमी संख्येने पडलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतदारसंघ यात असण्याची शक्यता आहे. या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व नोंदी आयोगाकडे पुरावा म्हणून दाखल करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com