Congress Politics : काँग्रेसचे मराठा कार्ड की ओबीसीवर नेत्यावर मदार, प्रदेशाध्यक्ष निवडीला उशीर?

Congress State President Nana Patole amit Deshmukh satej patil : काँग्रेसच्या वरिष्ठांना नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पुढील अध्यक्षाचे नाव निश्चित केल्यानतंर तो स्वीकारल्या जाण्याची चर्चा काँग्रेसमध्ये होती.
Congress Leaders
Congress LeadersSarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. निवडणुकीत अवघ्या 16 जागा मिळालेल्या काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व टिकवणे देखील अवघड असल्याच्या चर्चा होत्या. निवडणुकीतील अपयशानंतर नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनाम्याच्या एका महिन्यानंतरही नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही.

काँग्रेसच्या वरिष्ठांना नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पुढील अध्यक्षाचे नाव निश्चित केल्यानतंर तो स्वीकारल्या जाण्याची चर्चा काँग्रेसमध्ये होती. मात्र, काँग्रेस पक्षाचा खर्च उचलण्याची आर्थिक ताकद असलेले नेतेच प्रदेशाध्यक्ष पद नको म्हणत असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यात नवीन प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावा की मराठा यावर देखील एकमत होताना दिसत नाही.

Congress Leaders
Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीमध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांची नावे आघाडीवर होती. त्यामुळे काँग्रेसला मराठा प्रदेशाध्यक्ष मिळणार असे सांगितले जात होते. मात्र, राहुल गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारण्याची घाई नको, असे म्हटल्याची चर्चा आहे.

पटोलेंच्या दिल्ली वारीनंतर निर्णय

नाना पटोले हे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील या मराठा चेहऱ्यांसह विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या विदर्भातील ओबीसी नेत्यांच्या नावावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर?

विधानसभेत यश न मिळाल्याने काँग्रेससाठी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देखील आम्ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

Congress Leaders
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; जगमित्र कार्यालयाची चावी अजय मुंडेंच्या हाती, कराड सांभाळत होता काम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com