Andhare On Rane : 'ये पब्लिक सब जानती है,' राज्यसभेची टर्म संपली म्हणून...; अंधारेंनी मंत्री राणेंना डिवचलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती.
Narayan Rane and Sushma Andhare
Narayan Rane and Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणासंदर्भात राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनांशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, असे सांगत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या निर्णयाशी फारकत घेतली. त्यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. (Sushma Andhare On Narayan Rane)

मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मराठाबांधवांच्या आंदोलनाला मोठं यश आलं. जरांगे-पाटील यांच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या. यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे 'सगेसोयरे' यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही मागणी मान्य झाल्याची अधिसूचना सरकारने काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Rane and Sushma Andhare
BJP Vs India Alliance : भाजपनं पहिल्याच निवडणुकीत ‘इंडिया’ला चारली धूळ; विनोद तावडेंचा ‘मास्टरस्ट्रोक’

यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले. सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाज लढाई जिंकल्याचा जल्लोष करीत आहे. मात्र, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजप नेते नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. अंधारे म्हणाल्या, नारायण राणे यांनी सध्या परिस्थिती सोयीस्कर भूमिका घेतली आहे. खरंच जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था असती तर मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं, तेव्हा नारायण राणे यांनी तोंड उघडलं नाही. त्यांना ओबीसींबाबत काही वाटत असतं तर गेल्या दहा महिन्यांत त्यांनी ओबीसीच्या प्रश्नांवर काही भूमिका घेतली असती, असा टोला लगावला.

तसेच मराठा समाजाविषयी त्यांना काही वाटत असतं तर आरक्षणाविषयी योग्य प्रकारे मांडणी करून त्यांनी वेळप्रसंगी राजीनामा देण्याची आवश्यकता होती. मात्र अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली नाही, आता त्यांना राज्यसभेची फिकीर आहे. त्यांची खासदारकीची टर्म संपत असून टर्म वाढून घेण्यासाठी ते भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी हे राजकारण सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

तुम्हाला जर खासदार व्हायचं असेल तर तुम्ही धमक दाखवून निवडणुकांना सामोरे जा, वाटेल ते पद मिळवा. मात्र राजकारणासाठी समाजामध्ये दुही निर्माण करू नये, कारण 'ये पब्लिक है सब जानती है...' राज्यसभेची टर्म संपली म्हणून तुम्ही राजकारण करीत आहात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर केली.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Narayan Rane and Sushma Andhare
Hindu Jagruti Sabha : मुरलीधर जाधवांच्या सभेतून ठाकरेंचा फोटो गायब; तर रोहित पवारांच्या मागणीने सभा वादाच्या भोवऱ्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com