
Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाकडून अनोखी भेट मिळाली आहे. सांगलीचे शिवसेना जिल्हा चे प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी एकनाथ शिंदे यांचा पुतळा सांगलीत उभारण्यात असल्याची घोषणा केली आहे.
महेंद्र चंडाळे यांनी सांगितले की, 'सामान्यतः नेत्यांचे पुतळे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात. मात्र, जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या नेत्यांचा सन्मान त्यांच्याच हयातीत झाला पाहिजे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.'
एकनाथ शिंदे यांच्या या वाढदिवसाला पुतळा उभारण्याची घोषणा करताना त्यांच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचा पुतळा उभारून तयार असेल, असे देखील चंडाळे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा चंडाळे यांनी केली असली तरी या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून पुतळा उभारण्याच्या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसैनिकांनी मात्र पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागते. शिंदेंचा पुतळा उभारण्याचा घोषणा करणाऱ्या जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी घेतली आहे की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. एकनाथ शिंदे यांची या पुतळ्यासाठी मान्यता आहे का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.