राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

समीर वानखेडे हा पोपट असून त्याचा जीव भाजप पक्षामध्ये आहे.
Devendra Fadanvis Warning
Devendra Fadanvis WarningSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : समीर वानखेडे हा पोपट असून त्याचा जीव भाजप पक्षामध्ये आहे. पोपट अडकला आहे म्हणूनच भाजप तडफडत आहे. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती आहे असा आरोप आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे ना, त्याचे काय? असे म्हणत भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर पलटवार केला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadanvis Warning
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक म्हणाले..

फडणवीस म्हणाले, नवाब मलिक दिवसभर काहीतरी बोलतच असतात. आता सध्या त्यांना दुसरे काही कामही नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचे काही काम नाही. समीर वानखेडे हा भाजपचा पोपट आहे आणि भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता, ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे ना, त्याचे काय? ही बाब इतरांसाठी महत्वाची असेल, आमच्यासाठी अजिबात नसल्याचे त्यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना फटकारले आहे.

काल आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर काल दूपारी आणि रात्री सलग दोन ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोन ट्विट करत आपण अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे आणि आक्रमक होणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक आरोप तसेच खुलासे केले आहेत. समीर वानखेडे हा पोपट असून त्याचा जीव भाजप पक्षामध्ये आहे. पोपट अडकला आहे म्हणूनच भाजप तडफडत आहे. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची भाजपला भिती आहे असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com