
Swargate News : अशा घटनांबाबत बोलताना मंत्री, आमदारांनी निश्चितपणे संवदेनशीलपणे बोलले पाहिजे. बोलताना काही चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळा परिणाम होतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकारे यांचे कान टोचले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
मंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्वारगेट प्रकरणाबाबत माहिती दिली होती. यावेळी त्यांनी तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, तिथे कोणताही वादविवाद झाला नाही, त्यामुळे घटना अतिशय शांततेत घडली, असे म्हंटले होते. तर ही घटना पुण्यातच नाही, तर देशभरात अशा घटना घडत असतात, असे मंत्री संजय सावकरे म्हणाले होते.
दोन्ही मंत्र्यांच्या याच वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनीही दोन्ही मंत्र्यांवर टीका केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मला वाटते की, योगेश कदम जे बोलले, त्याचा विपर्यास करण्यात आला. माझा स्वतःचा समज आहे की, हा गर्दीचा भाग आहे, लोकं होते, बसही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. पण त्यानंतरही प्रतिकार होताना लोकांना लक्षात आले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न असावा, असे फडणवीस म्हणाले.
पण तरीही योगेश कदम नवीन मंत्री आहेत, तरुण आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात बोलताना अधिक संवदेनशीलपणे बोलले पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर वेगळा परिणाम होतो. त्यामुळे निश्चितपणे जे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी संवदेनशीलपणे बोलले पाहिजे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माध्यमांचे आणि मंत्र्यांचे कान टोचले. चौकशी सुरू असताना हा आरोपी इकडे गेला, तिकडे गेला अशा बातम्या दिल्या जातात. पण या माहितीचा विकृत आरोपी गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे माध्यमांनी बातम्या देताना काळजी घ्यावी. तसेच मंत्र्यांनीही बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.