
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर 70 तासांच्या शोधानंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुणाट गावातील ऊसाच्या फडातून त्याला मध्यरात्री दीड वाजता ताब्यात घेण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी गुणाट गावातील नागरिकांचेही मदतीबाबत आभार मानले.
याचवेळी अमितेश कुमार यांनी दत्ता गाडेच्या मेडिकल रिपोर्टविषयीही धक्कादायक माहिती दिली. त्याच्या गळ्याभोवती फासाचे व्रण आढळून आले. त्यामुळे दत्ता गाडे याने अटकेपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. मात्र दोरी तुटली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचे सांगितले.
अमितेश कुमार म्हणाले, दत्ता गाडेचे पहिले मेडिकल चेकअप झाले आहे. त्यात त्याच्या मानेवरती व्रण आढळून आले आहेत. त्यावरून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे सांगतात. पण दोरी तुटल्याने आणि लोक तातडीने पोहोचल्याने तो वाचला असे ग्रामस्थ सांगत आहेत. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी तिथे पोलिसांना जावे लागेल. त्यानंतरच काय ते कळेल.
आरोपी दत्ता गाडे याने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थ सांगतात. पहिल्यांदा दोरीने फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने तो प्रयत्न फसला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्यातूनही तो वाचला. त्यानंतर त्याने पुन्हा गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला वाचविले असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.