
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील.
प्रफुल्ल पटेल यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली.
या दोन्ही वक्तव्यांमुळे महायुतीतील रणनीतीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.
Pune News : राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिकच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही मोठ्या पक्षांसह मित्र पक्ष आणि स्थानिक आघाड्या मोर्चे बांधणीला लागल्याचे सध्याचे चित्र आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचक इशाऱ्याने मात्र महायुतीला धक्का लागण्याची शक्यता आहे. या बड्या नेत्याने मोठ्या निवडणुकीमध्ये महायुती शक्य आहे, मात्र या छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनात लक्षात घेऊन निवडणुका स्वतंत्र लढलेल्या बऱ्या असतात असे वक्तव्य केलं आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अद्याप अवधी असून आता फक्त मोर्चे बांधणीकडे सर्वच राजकीय पक्ष लक्ष देताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिकमध्ये महायुती म्हणूनच आपण लढू असे म्हटले आहे. मात्र जागा वाटपावरून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. तशीच घोषणा महाविकास आघाडीकडून देखील झालेली नाही.
एकीकडे फडणवीस यांनी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढल्या जातील. जेथे काही अपवाद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल. पण पहिला पर्याय हा महायुतीच असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अशातच राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र युतीबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.
पटेल यांनी, स्थानिकच्या निवडणुका या स्थानिक स्थरावरच्या लढवल्या जातात. त्यामुळे अनेक कार्यकर्ते ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र निवडणुकीचा मार्ग स्विकारला तर कार्यकर्त्यांना न्याय देता येतो. युती ही मोठ्या निवडणुकीमध्ये शक्य असते, असे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता स्थानिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलो रे च्या मूडमध्ये दिसत तर नाही ना असा सवाल आता होताना दिसत आहे.
दरम्यान आता राज्यात महायुती, महाविकास आघाडीला तिसरा पर्यात ठाकरे बंधुंची युती असेल अशी चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार अशा चर्चा सुरू असून तशी युती झाल्यास महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडेल असे बोलले जात आहे. पण अद्याप ठाकरे बंधुंकडून देखील शिवसेना-मनसे युतीबाबत अधिकृत अशी कोणतीच घोषणा झालेली नाही.
प्र.१: फडणवीस यांनी स्थानिक निवडणुकांबाबत काय भूमिका मांडली?
उ: त्यांनी या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील असं सांगितलं.
प्र.२: प्रफुल्ल पटेल यांनी काय वक्तव्य केलं?
उ: स्थानिक निवडणुका स्वतंत्र पद्धतीने लढवल्या जाऊ शकतात असं त्यांनी म्हटलं.
प्र.३: फडणवीस आणि पटेल यांच्या भूमिकेत काय फरक आहे?
उ: फडणवीस महायुतीवर ठाम आहेत, तर पटेल स्वतंत्र लढतीला पाठिंबा दर्शवत आहेत.
प्र.४: युती कोणत्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची आहे?
उ: मोठ्या निवडणुकांमध्ये जसे की विधानसभा आणि लोकसभा निवडणुका.
प्र.५: या वक्तव्यांचा परिणाम काय होऊ शकतो?
उ: महायुतीत गोंधळ वाढू शकतो आणि रणनीतीबाबत वाद निर्माण होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.