NCP Politics : 'आम्ही एकत्रच, गरज पडल्यास दादा, ताई...'; पुण्यात पवार कुटुंब एकाच बॅनरवर, राजकीय चर्चंना उधाण

NCP Banner in Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या पुण्यात संपूर्ण पवार कुटुंब एकाच बॅनरवर दिसल्याने या बॅनरची चर्चा राज्यभर पसरली आहे. नुकत्याच नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात एका माजी नगरसेवकाने 'झालं गेलं विसरून जा, दादा-ताई पुन्हा एकत्र या' असा संदेश असलेला बॅनर लावला होता.
A banner featuring Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule displayed in Pune, fueling discussions of NCP unity before the upcoming elections.
A banner featuring Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule displayed in Pune, fueling discussions of NCP unity before the upcoming elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 23 Sep : येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच पुण्यातील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या पुण्यात संपूर्ण पवार कुटुंब एकाच बॅनरवर दिसल्याने या बॅनरची चर्चा राज्यभर पसरली आहे. नुकत्याच नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात एका माजी नगरसेवकाने 'झालं गेलं विसरून जा, दादा-ताई पुन्हा एकत्र या' असा संदेश असलेला बॅनर लावला होता.

आता पुण्यातही असाच एक बॅनर झळकला असून, त्यावर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो आहे. बॅनरवर 'आम्ही एकत्रच' असा मजकूर लिहिलेला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

A banner featuring Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule displayed in Pune, fueling discussions of NCP unity before the upcoming elections.
Maharashtra Rain update : फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर; 8-10 दिवसांत बँकेत जमा होणार, मराठवाड्याला सर्वाधिक...

हा बॅनर पुण्यातील सिटी प्राईड चौकात लावण्यात आला आहे. त्यावर 'आम्ही एकत्रच! विचार भिन्न असले तरी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. गरज पडल्यास ताई आणि दादा एकत्र येतील, असा आमचा विश्वास' असं लिहिलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी हा बॅनर लावला आहे.

या बॅनरमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांसह भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाले.

A banner featuring Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule displayed in Pune, fueling discussions of NCP unity before the upcoming elections.
Ajit Pawar : अजितदादा ग्राउंडवर उतरताच ठाकरेंना दे धक्का, लोकसभा लढवणारा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

या निर्णयानंतर काही वेळा अजित पवार आणि शरद पवार एका व्यासपीठावर दिसले, तर काही वेळा दोन्ही गटांमध्ये तीव्र टीका झाली. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत झाली, तर विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यातही सामना रंगला.

मात्र, कौटुंबिक समारंभांत पवार कुटुंब अनेकदा एकत्र दिसले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार होतात. आता नागपूर आणि पुण्यातील बॅनरमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com