Devendra Fadnavis : शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, 'लाडकी बहीण योजना..'

Political News : मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली.
devendra fadnavis ladki bahin yojana
devendra fadnavis ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर उत्साही वातवरणात पार पडला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी येत्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis News)

येत्या काळात निकषांमध्ये बसणाऱ्या महिलासाठी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण योजना येत्या काळात सुरुच ठेवणार आहे. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी 2100 महिलांना देऊ, असा आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान दिले होते. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2100 रुपये देणार असल्याचे स्पष्ट केले.

devendra fadnavis ladki bahin yojana
Devendra Fadnavis : राज्यात उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही 'हे' मिथक फडणवीसांनी काढले मोडीत

निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करण्यात येईल. नवे सरकार हे धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. नवे सरकार अधिक जोमानं आणि गतीनं काम करणार आहे. आमच्या कामाची दिशा बदणार नाही. दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊलं उचलणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis ladki bahin yojana
Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईन ते मेरे किनारे पर घर मत बसा लेना...'; फडणवीसांच्या भाषणातील गाजलेले डायलॉग

नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार

मी जनतेला विश्वास देतो की हे सरकार पूर्णपणे पारदर्शी कारभार करणार आहे. येत्या सात, आठ आणि नऊ तारखेला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा देखील पूर्ण झाली आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

devendra fadnavis ladki bahin yojana
CM Devendra Fadnavis: 'दिल्लीश्वरां'चं धक्कातंत्र नाही चाललं, राजस्थान, मध्यप्रदेश 'पॅटर्न'ही फेल; कारण महाराष्ट्रात फडणवीस नाम ही काफी है..!

योजनेचा सरसकट पुनर्विचार करणार नाही

शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होत . तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. नंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं आम्ही निकषात बसत नाही. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल, पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचे कारण नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis ladki bahin yojana
Devendra Fadanavis : शपथविधीच्या काही क्षण आधीच देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com