Devendra Fadanavis : शपथविधीच्या काही क्षण आधीच देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट

Political News : शपथविधीला निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरीता फडणवीस यांनी घरी त्यांचे औक्षण करीत आशीर्वाद दिले आहेत.
Devendra Fadanavis, Sarita Fadanavis
Devendra Fadanavis, Sarita FadanavisSarakrnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. हा दिवस भाजपमधील नेतेमंडळीच्या दृष्टीने सोनियाचा दिवस आहे. शपथविधीला निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरीता फडणवीस यांनी घरी त्यांचे औक्षण करीत आशीर्वाद दिले आहेत. हा औक्षण करतानाच्या क्षणाचे छायाचित्र व त्यासोबतच 'मायेचे औक्षण! आईच्या आशीर्वादाने नव्या पर्वाचा आरंभ...' असे त्याला कॅप्शन देत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. (Devendra Fadanavis)

महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. यावेळी होत असलेल्या या दिमाखदार शपथविधी सोहळ्यास पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह १९ राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे (Bjp) बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे.

Devendra Fadanavis, Sarita Fadanavis
Devendra Fadnavis : राज्यात उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही 'हे' मिथक फडणवीसांनी काढले मोडीत

या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरातून निघाले. त्यावेळी त्यांच्या मातोश्री सरीता फडणवीस यांनी घरी त्यांचे औक्षण करीत आशीर्वाद दिले. या पूर्वी त्यांच्या मातोश्रीने महायुतीच्या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली होती. लेकाच्या विजयाची अपेक्षा होतीच, पण इतका ऐतिहासिक विजय मिळेल, असे वाटले नव्हते, असे सरीता फडणवीस म्हणाल्या होत्या.

Devendra Fadanavis, Sarita Fadanavis
Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईन ते मेरे किनारे पर घर मत बसा लेना...'; फडणवीसांच्या भाषणातील गाजलेले डायलॉग

दरम्यान, त्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्रच्या विजयाची अपेक्षा होतीच, त्यांचे जे पाच वर्ष काम चाललेलं, त्याने किती मेहनत केली आहे, हे पाहिले आहे, पण इतका ऐतिहासिक विजय मिळेल, असे वाटलं नव्हतं. विजय मिळणार हे निश्चित होते, पण या वेळेचा विजय अभूतपूर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री म्हणाल्या होत्या.

Devendra Fadanavis, Sarita Fadanavis
Devendra Fadnavis Banners : ‘मी पुन्हा येईल' ऐवजी आता ‘तो पुन्हा आलाय...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com