Devendra Fadnavis: CM फडणवीसांची मोठी खेळी, एकेकाळी प्रशासन हादरवणारा 'हा' धडाकेबाज अधिकारी पुन्हा टीममध्ये दाखल होणार?

CM Devendra Fadnavis And Praveen Pardeshi : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रशासनात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाका लावला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांचेच धाब दणाणले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रशासनात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाका लावला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांचेच धाब दणाणले आहेत. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दुसरीकडे त्यांच्या मर्जीतल्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या टीममध्ये एन्ट्री दिली आहे.यावरुन मुत्सद्दी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रशासनावरची पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं पावले टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सचिवालयात परदेशी यांना एन्ट्री होणार आहे. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांच्याकडे फडणवीसांनी नवी जबाबदारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व मर्जीतले अधिकारी म्हणून प्रवीण परदेशींची ओळख आहे. सध्या ते 'मित्रा' या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही परदेशी यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Devendra Fadnavis
Supreme Court Big Decision: सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारलं; राष्ट्रपतींना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही प्रवीण परदेशी यांनी काम पाहिले होते. सीएम फडणवीस यांनी प्रवीँ परदेशींवर एकीकडे पूर्ण विश्वास टाकतानाच त्यांना पूर्ण कामाचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचेही बोलले जाते. तसेच त्यांच्या कामाच्या पध्दतीवरही फडणवीसांनी नेहमीच समाधान व्यक्त केलेले आहे.

1985 च्या बॅचचे निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी प्रवीण परदेशी यांची आता निवृत्तीनंतर नवी इनिंग सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडे मुंबई हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षपदाची जबाबदारीही सध्या आहे.

Devendra Fadnavis
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंची शिवसेना मित्रपक्षाला 'कात्रजचा घाट' दाखवणार; महापालिका निवडणुकांसाठी भाजप अन् राष्ट्रवादीला बाजूला सारणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.त्याच धर्तीवर परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

महायुती सरकार असताना राज्याच्या तिजोरीतील पैशांचा योग्य वापर,आर्थिक व्यवस्थेला गती देण्यासाठीचे उपाययोजना,योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार हलका कसा करायचा अशा विविध कारणांमुळे अनुभवी व तितकेच अभ्यासू प्रवीण परदेशी यांना सीएम फडणवीसांकडून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com