Mantralaya employees strike : फडणवीस सरकारकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न : अखेर 'तो' आदेश धडकला!

Devendra Fadnavis government Mantralaya employees strike : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. शासनाच्या या आदेशात नेमके कोणते निर्देश दिले आहेत? जाणून घ्या सविस्तर.
Mantralaya employees strike : फडणवीस सरकारकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न : अखेर 'तो' आदेश धडकला!
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

वेतनश्रेणीत बदल आणि पदनाम बदलण्याच्या मागणीसाठी मंत्रालयातील लिपिक आणि टंकलेखकांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्यासाठी शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, 'काम नाही, वेतन नाही' हे धोरण लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतनातील विसंगती दूर करावी, सातव्या वेतन आयोगासंदर्भातील बक्षी समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच लिपिक-टंकलेखक संवर्गाचे पदनाम बदलून 'मंत्रालय सहाय्यक' करावे, अशा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मंत्रालयातील लिपिकांची सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याचा मुद्दाही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mantralaya employees strike : फडणवीस सरकारकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न : अखेर 'तो' आदेश धडकला!
Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी टोकाचा वाद ; भाजप-शिवसेना आमनेसामने, युती तुटण्याच्या उंबरठ्यावर?

संपात सहभागी होणे ठरणार गैरवर्तणूक!

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कामबंद आंदोलनात सहभागी होणे ही गैरवर्तणूक मानली जाणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आंदोलनाच्या काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या कालावधीतील वेतन दिले जाणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्याचे आदेश

कामबंद आंदोलनाच्या काळात कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये, असे निर्देश सरकारने दिले आहेत. यापूर्वीच रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना तातडीने कामावर बोलावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जबाबदार अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन परिपत्रकात नेमके कोणते आदेश?

  • आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

  • 'काम नाही, वेतन नाही' हे धोरण लागू करावे.

  • संपातील सहभाग गैरवर्तणूक मानण्यात यावा.

  • आंदोलनाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये.

  • रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना कामावर बोलवावे.

  • जबाबदार अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये.

  • मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महासंघाचा पाठिंबा

Mantralaya employees strike : फडणवीस सरकारकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न : अखेर 'तो' आदेश धडकला!
Pune PMC : स्थायी समिती अध्यक्षांनंतर आता महापौर अन् काँग्रेस गटनेते प्रशासनाच्या रडारवर; त्या 'एका' उपहासात्मक टोल्यामुळे पुणे पालिकेत खळबळ!

राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करून त्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.