Savali Bar Case: 'सावली बार'वर दोनदा कारवाई! FIR, RTI मधून मिळाली माहिती; योगेश कदमांसाठी अनिल परबांनी दिले पुरावे

Savali Bar Case: अनिल परबांनी केलेले आरोप कदमांनी नाकारले होते. तसंच आपल्यावर आणि कुटुंबावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचंही म्हटलं होतं.
Anil Parab Vs Yogesh Kadam
Anil Parab Vs Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Savali Dance Bar Case: राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या मालकीच्या सावली डान्सबारबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेले आरोपांवर काल कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. यामध्ये त्यांनी परबांनी केलेले आरोप नाकारले होते, आपल्यावर आणि कुटुंबावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच अनिल परब यांच्याविरोधात आपण बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचंही म्हटलं होतं.

यापार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपण केलेले आरोप बिनबुडाचे नाहीत, त्याची अधिकृत कागदपत्रे आपल्याकडं असल्याचं सांगत ती सादरही केली. सावली बारवर दोनदा कारवाई झाली आहे त्याची गुन्हा दाखल झाल्याची अर्थात एफआयआरची कॉपी तसंच सावली बारबाबतची माहिती आपल्याला माहिती अधिकारातून प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Manikrao Kokate: इकडे कोकाटेंचा विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा; तिकडे राजीनाम्यासाठी 'दिल्ली'त हालचाली; 'मामा कनेक्शन' मोठा निर्णय घेणार?

त्याचबरोबर गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबियांना विविध उद्योगांमधून कसा फायदा मिळवून दिला, हे सांगताना हा Conflict of Interestचा मुद्दा असल्याचं सांगत सावली बारसह, जगबुडी नदीतील वाळूचा व्यवहार आणि इतर काही व्यवहारांबाबतचे सर्व पुरावे आपण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करणार आहोत, असं सांगितलं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणांवर काय कारवाई केली याचा प्रत्येक आठवड्याला आपण फॉलोअपही घेणार आहोत. जोपर्यंत गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, असं सांगताना गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा, अशी मागणीही केली.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Sanjay Shinde : ...तर संजय शिंदे आज आमदार असते : सुनील तटकरेंनी सांगितली विधानसभा निवडणुकीतील ‘ती’ गोष्ट!

परबांनी कुठले मुद्दे मांडले?

नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी अनिल परब यांनी Conflict of Interestचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे सावली बारमध्ये अश्लिल नृत्य आणि कृत्ये सुरु असल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर रामदास कदम यांनी हा बार आपल्या पत्नीच्या नावे असल्याचं मान्यही केलं होतं. यानंतर दोन्ही कदम पिता-पुत्रांनी अनिल परब यांना प्रत्युत्तरही दिलं होतं. अनिल परब यांना अर्धवट वकीली ज्ञान असल्याची टीकाही गृहराज्यमंत्र्यांनी त्यांच्यावर केली होती. तसंच त्यांनी विधीमंडळाचे नियम मोडून माझ्यावर आरोप केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं त्यांना उत्तर देण्यासाठी अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना पुणे कोर्टाची नोटीस! आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

माहिती अधिकारातून माहिती

या पत्रकार परिषदेत परब म्हणाले, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावर आरोप केले. त्यांच्या मातोश्रीच्या नावानं असलेल्या बारमध्ये डान्सबार चालवला जात होता. अश्लिल नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते असे आरोप मी केले होते. याची संपूर्ण माहिती मला माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे. त्यामुळं ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीनुसार, २२ बारबाला आणि २२ ग्राहक, ४ कर्मचारी यांच्यावर कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सर्व तुडवले गेलेलेच आहेत.

Anil Parab Vs Yogesh Kadam
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट!

बारवर दोनदा कारवाई

गृहराज्यमंत्र्यांनी काल माझा उल्लेख अर्धवट वकील असा केला. त्यांना एक गोष्ट कळली पाहीजे विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही तर आमदार म्हणून बोलतो. आमदारकीची माझी चौथी टर्म आहे. त्यामुळं विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे चांगले माहिती आहेत. त्यामुळं मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तसंच डान्सबार आम्ही चालवायला दिल्याचं सांगितलं. पण कायद्यानुसार कुठलाही डान्सबार चालवताना एक नोकरनामा असतो. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरुन द्यावी लागते, या नोकरनाम्यावर मालकाला सही करावी लागते.

जर एखादं कृत्य मालकाच्यावतीनं प्राधिकृत केलेल्या व्यक्तीनं केलं तर त्याची माहिती मिळताच मालकानं ते बंद करणं गरजेचं आहे. पण जर हे म्हणत असतील की यांना माहितीच नव्हतं तर २८ मे २०२३ आणि १० ऑगस्ट २०२३ रोजी या बारवर दोनदा रेड झाली आहे. याच्या एफआयआरच्या कॉपी माझ्याकडं आहेत. म्हणजेच तुमच्याबारमध्ये डान्सबार चालतो हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही कुठलीही खबरदारी घेतलेली नाही त्यामुळं इथं थेट तुमची जबाबदारी निश्चित होते, असं यावेळी अनिल परब यांनी सांगितलं.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Jagdeep Dankhar Resigns: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा अचानक राजीनामा! वैद्यकीय कारणास्तव पद सोडत असल्याची घोषणा

फडणवीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या हे सर्व कागद मी देणार आहे. तसंच त्यांच्यावर काय कारवाई करणार? तसंच डान्सबारचे जे नियम आहेत ते तुडवलेले आहेत. ऑर्केस्ट्राचे नियम मोडलेले आहेत. पोलिसांकडं सर्व अश्लिल कृत्यांचे रेकॉर्डिंग आहेत. त्यामुळं यामध्ये काहीही सिद्ध करण्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. तसंच जोपर्यंत ते ही कारवाई करत नाहीत तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला मी त्यांना स्मरणपत्र देणार आहे की त्यांनी काय कारवाई केली आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com