Ajit Pawar Video : 'मी अजित आशाताई अनंतराव पवार...', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अजितदादांनी घडवला इतिहास!

Ajit Pawar DCM Oath Ceremony : अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये सहभागी होते अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची आज शपथ घेत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. 1991 मध्ये पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेमध्ये गेले होते.

अजित पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळाता नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 या कालावधीमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपद भूषवले होते.त्यानंतर पुन्हा ते ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपदी होते .

Ajit Pawar
Devendra Fadnavis : शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, 'लाडकी बहीण योजना..'

2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. मात्र, तीन दिवसांत त्यांनी फडणवीसांची साथ सोडून ते महाविकास आघाडीत आले होते. फडणवीसांच्यासोबत शपथ घेतल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री होते.

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. नंतर अजित पवारसुद्धा या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये सहभागी होते अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते.

Ajit Pawar
Mahayuti News : मुख्यमंत्री पद गाजविल्यानंतर 'हे' पाच नेते झाले होते पुन्हा मंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com