

Assembly Session News : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात अनेक गंमती जंमती, किस्से घडत आहेत. सत्ताधारी-विरोधकांमधील खडाजंगी, टोले-टोमणे आणि बरचं काही. राज्यात सध्या 'लाडकी बहीण' योजनेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मतांसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे सरकाकडे विकासकामे आणि इतर योजना राबवण्यासाठी पैसाच नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच बेजार झाले होते.
त्यात भाजपचेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थितीत करतांना लाडक्या बहीणींचा संदर्भ दिला. झालं सत्ताधारी आमदाराकडूनच लाडकी बहीण योजनेवर टीका होतेयं, असा समज फडणवीसांचा झाला आणि त्यांनी आपल्या उत्तरात अभिमन्यू पवार यांना लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, असे म्हणत सुनावले. झालं मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या आमदाराला झापल्याच्या बातम्या चॅनल आणि सोशल मिडियावर सुरू झाल्या.
अभिमन्यू पवारही यामुळे व्यथित झाले, पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून अनेक वर्ष काम केले असल्यामुळे नेमका घोळ काय झाला? हे चाणाक्ष पवारांच्या लक्षात आले. सभागृहातील कामकाज संपल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अवैध दारू विक्रीचा मुद्दा आपण सभागृहात मांडतांना यामुळे लाडक्या बहीणींना त्रास होतो, त्यांच्या मुला-बाळांना त्रास होतो, त्यामुळे अवैध दारू विक्रीवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी होती, हे अभिमन्यू पवारांनी फडणवीसांच्या लक्षात आणून दिले.
मग मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आपली चूक आली. रात्री जेव्हा ते माध्यमांना सामोरे गेले, तेव्हा पुन्हा अभिमन्यू पवारांना झापल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थितीत केला, यावर मात्र फडणवीसांना हसू आवरले नाही. अभिमन्यू पवार यांना झापल्याच्या बातम्या तु्म्ही सगळ्यांनी चालवल्या, पण मी त्यांना काही झापले वगैरे नाही. मुळात माझ्या ऐकण्यात चूक झाली.
अभिमन्यू पवार यांनी अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात उपस्थितीत केला तेव्हा लाडक्या बहीणींचा उल्लेख केला. तो त्यांना अवैध दारू विक्रीमुळे होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने होता. पण माझ्या ऐकण्यात चूक झाली. उलट मी त्यांच्या मुद्यावर तातडीने अॅक्शन घेण्याच्या सूचना दिल्याचे फडणवीसांनी आवर्जून सांगितले. अभिमन्यू पवार हे फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या मतदारसंघातील राबवलेले अनेक उपक्रम हे राज्य पातळीवर रोल माॅडल म्हणून घेतले गेल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.