

Assembly Session News : नागपूरातील हिवाळी अधिवेशना दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली होती. आता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोट्यावधी रुपये जमा असताना शेतकऱ्यांना फक्त 75 हजार रुपयांची मदत दिली गेल्याचा दावा करत दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75 हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा टोला अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडिया वरील पोस्टद्वारे लगावला.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या पत्राचा आधार देत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर तातडीन मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. तसेच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर तातडीने कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत चौकशी अंती कारवाईची वाट पाहत आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिले आहे.
श्री अंबादास दानवे जी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते.
आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते, असे नमूद करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांनी या खुलाशावरही भाष्य करणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईचे अनुदान पूर्णपणे मिळालेले नाही. 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच आतापर्यंत फक्त 14 हजार कोटींचेच वाटप झाल्याचे मान्य केल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75 हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.