

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. या विषयावर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते. सुनेत्रा पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याची चर्चा होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांना या विषयी पत्रकारांनी राष्ट्रवादीकडून अर्थखाते मागितल्या जात असल्याचे विचारले असता ते म्हणाले, 'तुम्हाला मागितलं का? मला नाही मागितलं. मला मागितलं तर मी सांगेन.'
राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली गेली. याबाबत पत्रकांनी विचारले असता ते म्हणाले, 'माझ्यापर्यंत आली तर मी योग्य उत्तर देईल.'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे अर्थमंत्रिपदाबाबतच निर्णय दिल्लीत होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ आणि गृहमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत शब्द देण्यात आला होता. पण वारंवार विषय काढूनही मुख्यमंत्री अद्यापही अर्थखात्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. मात्र, त्यांचे विमानदुर्घटनेत अपघाती निधन झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना अर्थखाते मिळणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यास कमी कालावधी असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते खाते आपल्याकडे ठेवले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप हे खाते मुख्यमंत्र्याकडेच असल्याने राष्ट्रवादीतील नेते नाराजी व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.