Government Decision : फडणवीसांनी आणखी एका योजनेला लावला 'ब्रेक', कोणाला बसणार फटका?

Devendra Fadnavis latest government decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका सरकारी योजनेला ब्रेक लावला आहे. नेमकी कोणती योजना थांबवण्यात आली? या निर्णयाचा कोणत्या लाभार्थ्यांना फटका बसणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आणखी एका योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नगरपालिकांच्या पाणीपुरवठा आणि मलनिःसारणासाठी दिले जाणारे सहायक अनुदान बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे या निर्णयाचा नेमका परिणाम कोणावर होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्य सरकारने योजनांचे सुसूत्रीकरण (Rationalization of Scheme) करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत हा निर्णय घेतला आहे. नगरपालिकांच्या पाणीपुरवठा आणि मलनिःसारण योजनांसाठी सुरू असलेल्या सहायक अनुदानाचे लेखाशीर्ष 2215 8973 बंद करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विशिष्ट लेखाशीर्षाअंतर्गत मिळणारे अनुदान आता बंद होणार आहे.

Devendra Fadnavis
Fraud Case Pune : IAS अधिकाऱ्याची बतावणी अन् 35 लाखांची लुट; 21 वर्षीय तरुणाच्या भामटेगिरीने खळबळ!

सरकारच्या निदर्शनास आले की, शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा तसेच मलनिःसारणाच्या कामांसाठी समान उद्देश असलेल्या दोन स्वतंत्र अनुदान योजना सुरू आहेत. त्यामुळे एकाच प्रकारच्या कामांसाठी योजनांची पुनरावृत्ती होत असल्याचे लक्षात आले. यामुळे निधीचा योग्य वापर व्हावा आणि योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक व्हावी, यासाठी सरकारने हा बदल केला आहे.

दरम्यान, शहरी भागातील पाणीपुरवठा आणि मलनिःसारणाची कामे यापुढेही नगरविकास विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. यासाठी अमृत योजना आणि नगरोत्थान महाअभियान या योजनांअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे नगरपालिकांसाठीची संबंधित सहायक अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि मलनिःसारण योजनांसाठीचे अनुदान बंद करण्यात आलेले नाही. लेखाशीर्ष 2215 A014 अंतर्गत ग्रामीण भागासाठीची स्वतंत्र अनुदान योजना सुरूच राहणार आहे.

Devendra Fadnavis
Jalgaon Bank Election : जिल्हा बँकेत महायुतीची खेळी : मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचा खडसेंना धक्का की भाजपला आव्हान?

थोडक्यात सांगायचे झाल्यास, सरकारने संपूर्ण पाणीपुरवठा योजना बंद केलेली नसून नगरपालिकांसाठीची विशिष्ट सहायक अनुदान योजना बंद केली आहे. योजनांमधील दुबारपणा टाळणे, निधीचा योग्य विनियोग करणे आणि सरकारी खर्चाचे सुसूत्रीकरण करणे हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम प्रामुख्याने नगरपालिकांच्या संबंधित अनुदान व्यवस्थेवर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.