Jalgaon Bank Election : जिल्हा बँकेत महायुतीची खेळी : मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचा खडसेंना धक्का की भाजपला आव्हान?

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. यावेळी रात्रभर राजकीय हालचाली गतिमान होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी विविध नेत्यांशी राजकीय संवाद साधला.
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News, 18 Nov : जळगाव जिल्हा बँक निवडणूक चांगलीच रंगत आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जागा बिनविरोध करून महायुतीने आघाडी घेतली. मात्र प्रतिष्ठेच्या मुक्ताईनगर येथील निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. यावेळी रात्रभर राजकीय हालचाली गतिमान होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी विविध नेत्यांशी राजकीय संवाद साधला. जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी बारा ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे.

यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सर्वाधिक चार संचालक बिनविरोध झाले. भाजपचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे 12 संचालक बिनविरोध करण्यात महायुतीला यश आले.

Jalgaon District Bank Election
Pune Timber Market : पुण्यात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव! 25 हून अधिक दुकाने जळून खाक

या सर्व राजकीय घडामोडी आता जिल्हा बँक निवडणूक मुक्ताईनगर गटात केंद्रित झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी येथे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीत रंगत आणली. त्यामुळे महत्त्वाच्या या जागेवर निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले की ठरवून झाले अशी चर्चा रंगली आहे.

सुरुवातीलाच खडसे मुक्त जिल्हा बँक अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. आता मुक्ताईनगर या खडसे यांच्या बालेकिल्ल्यात रक्षा खडसे यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी आपली ताकद लावली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे सर्व राजकारण मुक्ताईनगर गटामध्ये रंगणार आहे.

Jalgaon District Bank Election
Maharashtra Land Survey : जमीन मोजणीचा वेटिंग संपणार! राज्यात 5 हजार खासगी सर्व्हेअर अन् 15 दिवसांत मोजणी, सरकारचा मोठा निर्णय

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपने त्यांना आव्हान दिले आहे. मुक्ताईनगर गटात खडसे उमेदवार आहेत. आता मतदारच हा महत्त्वाचा निकाल देतील. घोडा मैदान जवळ आहे, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी भाजपला दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.