Devendra Fadnavis: 'आंदोलनाच्या आडून सत्तांतराचा डाव...';मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर गंभीर आरोप

SIR Controversy News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरविरोधातील आंदोलनांवरून राहुल गांधी, इंडिया आघाडी आणि विरोधकांवर सत्तांतराचा डाव असल्याचा आरोप केला. प्रशांत भूषण यांच्या विधानानंतर राजकीय वादाला नवे वळण मिळाले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

SIR Process News: काँग्रेस,विरोधकांची इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टीनं देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि एसआयआर प्रक्रियेवरुन गंभीर आरोप करत रान पेटवलं आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या नेत्यांना ताब्यात घेत कार्यकर्त्यांची धरपकडही केली होती. त्यानंतर वकील प्रशांत भूषण यांनी सत्ता बदलण्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी(ता.17 ऑक्टोबर) सोशल मीडियावरील प्लॅट फॉर्मवर ट्विट करत विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले,देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या उद्देशानं आंदोलनांचा वापर केला जात आहे. लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मताच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने त्यांच्या तोंडून ते 'सत्य’ बाहेर आलं.देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा डाव अखेर उघड झाला असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

राहुल गांधींसह इंडिया आघाडी अन् सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.त्यांना SIR का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायचीय. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्याची शक्यता नसल्यामुळेच ‘रेजीम’ बदलण्याची भाषा. सत्ता उलथून टाकायचीय, पण लोकशाही मार्गाने नव्हे. SIRला विरोध हे फक्त निमित्त आहे, त्यांचा खरा विरोध लोकशाहीला असल्याचा निशाणाही त्यांनी विरोधकांवर साधला.

Devendra Fadnavis
Abdul Sattar : शिंदेंच्या शिवसेनेत चाललय तरी काय? एकीकडे सतीश चव्हाण यांना पाठिंबा, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार म्हणतात, माझी पसंती शरद पवार साहेबांच्या उमेदवाराला!

SIR शिवाय पर्याय नाहीच...

मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये विरोधकांचा खरा विरोध तुमच्या आमच्या पात्र मतांना असल्याचा दावा केला आहे.आता आपल्याला ठरवायचंय,लोकशाही हवी की ‘रेजीम’ बदलण्याची भाषा करणारे? लोकशाहीसाठी SIR शिवाय पर्याय नाहीच असंही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.

Devendra Fadnavis
Madhusudan Kendre : डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी, आमदार रत्नाकर गुट्टेंसह चौघांविरुद्ध पोलीसात तक्रार; मधूसुदन केंद्रे आक्रमक

प्रशांत भूषण यांचं विधान काय?

वकील प्रशांत भूषण यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत "आम्हाला रेजीम चेंज हवं आहे" असं विधान केलं होतं."जर सरकारला असं वाटत असेल की, ही रेजीमची लढाई आहे,तर हो आम्हाला रेजीम हवंच आहे.लोकशाहीत सरकार बदलण्याची मागणी करणं हा काही गुन्हा नसल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com