Devendra Fadnavis: अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या काहीक्षण आधी फडणवीसांनी काढला आणीबाणीचा मुद्दा; भावनिक होत म्हणाले...

Devendra Fadnavis Emergency Issue News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षांच्या आमदारांना बोलण्यास कमी वेळ देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील यांच्या आधी बोललेल्या आमदारांच्या भाषणाची वेळ सांगितली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सत्तेत येता येत नाही म्हणून ते देशातील संस्थांना बदनाम करत असल्याचा आरोप केला.

यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी संविधानावर चर्चा केली. त्यामध्ये विरोधी पक्षाच्या आमदाराचा ही समावेश होता. याच वेळी सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आणीबाणीच्या काळात, वडील, काकूंना दोन वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागला होता. विरोधी पक्षांच्या एक लाखापेक्षा जास्त लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते, याची आठवण करून दिली.

Devendra Fadnavis
Latur BJP politics : लातूर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदावरून रस्सीखेच; 'या' नेत्यापैकी कोणाची लागणार वर्णी ?

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. विधानसभेत राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संविधानावर विचार मांडले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षांच्या आमदारांना बोलण्यास कमी वेळ देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील यांच्या आधी बोललेल्या आमदारांच्या भाषणाची वेळ सांगितली.

Devendra Fadnavis
BJP Leader Arrested : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता अडचणीत; इचलकरंजीतून पोलिसांनी केली अटक

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संविधान निर्मितीचा इतिहास आणि त्यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावरही प्रकाश टाकला. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही. त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा देताना आणीबाणीच्या काळात त्यांच्या वडील, काकूंना दोन वर्षे तुरुंगवास झाल्याची आठवणही सांगितली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या नावे विरोधकांना फडणवीसांनी का मारला टोला?

गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघा देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा अन् सीएम फडणवीस म्हणाले, '...नेहमीच असमाधानी असतो, कधीच समाधानी नसतो'

पटोलेंना लगावला टोला

विधानसभेत पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी संविधानावर बोलताना काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांनी राजकीय भाषण करू नये म्हणून आवाहन केले होते. पण यावेळी सर्वात जास्त राजकीय तेच बोलले, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Devendra Fadnavis
Kunal Kamra : तुफान राडा, पुन्हा गाणं! शिवसेनेचा थेट इशारा, 'मुंबईतच काय महाराष्ट्रात कुणाल कामराचा शो होवू देणार नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com