Devendra Fadnavis News: फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट,धनंजय मुंडे मला दोन नाही,तर तीनवेळा भेटले अन् त्यात मंत्रिमंडळाची...

Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्याला कृषिखातं मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाष्य केलं. त्याचबरोबर भेटीबाबतचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
Dhananjay Munde- Devendra fadnavis News
Dhananjay Munde -Devendra fadnavis Newssarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. माणिकराव कोकाटेंना कृषीखात्यापासून दूर
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंकडील कृषी खाते काढून घेतले असून त्याजागी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली आहे.

  2. धनंजय मुंडे यांच्या लॉबिंगवर फडणवीसांचा खुलासा
    फडणवीसांनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडे यांनी तीनवेळा भेट घेतली पण त्या भेटी मंत्रिमंडळ पुनर्नियुक्ती संदर्भात नव्हत्या.

  3. मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांना इशारा
    फडणवीसांनी मंत्र्यांना अनुशासनाबाबत तंबी दिली असून, जनतेची सेवा करताना वर्तनावर आणि भाषेवर नियंत्रण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना मोठा दणका देत त्यांच्याकडील कृषिखातं काढून घेतलं. त्यांच्या जागी नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोकाटेंकडे क्री़डा खातं देत त्यांचं एकप्रकारे डिमोशनच करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान,धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा कृषिखातं मिळावं यासाठी लॉबिंग केल्याची चर्चा होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Maharashtra CM Devendra Fadnavis disclosed that Dhananjay Munde met him thrice but no discussions regarding a cabinet return took place. Get the latest political updates here)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शुक्रवारी(ता.1 ऑगस्ट)मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दोन भेटी घेतल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. धनंजय मुंडेंनी माझी तीनवेळा भेट घेतल्याचा खुलासा करतानाच ही भेट मंत्रिमंडळातील कमबॅक संदर्भात नव्हती असंही स्पष्ट केलं आहे. मुंडेंनी आपली तीनवेळा भेट घेण्यामागं वेगवेगळी कारणं होती असंही त्यांनी सांगितलं

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुन्हा एकदा आपल्याला कृषिखातं मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाष्य केलं. त्याचबरोबर भेटीबाबतचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. तुमची माहिती अर्धवट आहे, धनंजय मुंडेंनी माझी तीनवेळा भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझी तीनवेळा भेट घेतल्याचा खुलासा करतानाच ही भेट मंत्रिमंडळातील कमबॅक संदर्भात नव्हती असंही स्पष्ट केलं आहे. मुंडेंनी आपली तीनवेळा भेट घेण्यामागं वेगवेगळी कारणं होती असंही त्यांनी सांगितलं.

Dhananjay Munde- Devendra fadnavis News
Mahadevi Elephant Case: कोल्हापूरकरांच्या दबावापुढे 'वनतारा' प्रशासन झुकलं : खासदार माने अन् महाडिकांचे शिष्टाईचे प्रयत्न सुरु

धनंजय मुंडेंसोबतच्या कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो, असं स्पष्ट मतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यामुळे सध्यातरी मुंडे यांचं मंत्रिमंडळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माणिकराव कोकाटेंसह सर्वच वादग्रस्त मंत्र्‍यांचे कान टोचले. मुख्यमंत्री म्हणाले, आता जर कोणी अशाप्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपण जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत आणि जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, काय करतो, कसे बोलतो, या सर्व गोष्टी दिसतात आणि त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अशा शब्दांत फडणवीसांनी मंत्र्यांना तंबी दिली.

Dhananjay Munde- Devendra fadnavis News
Mahadev Munde SIT Probe : अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री : महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन

फडणवीस म्हणाले, जी काही घटना घडली, त्यानंतर एक मोठा रोष होता, त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे, आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे.

माणिकराव कोकाटेंना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे दत्तात्रयमामा भरणे यांच्याकडे देण्यात आले. दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com