Mahadev Munde SIT Probe : अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री : महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन

Mahadev Munde Murder Case: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे.
Mahadev Munde Murder Case
Mahadev Munde Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 01 Aug : बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी (ता.31) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड व त्याचा मुलगाही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.

शिवाय या हत्ये प्रकरणी अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही. नुकतंच आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.

Mahadev Munde Murder Case
Maharashtra Politics : खातं बदललं तरी सुट्टी नाय! कोकाटेंचा व्हिडिओ दाखवणाऱ्या पवारांचे ओपन चॅलेंज, म्हणाले, सुटलो असा गैरसमज...

त्यानंतर काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता. अशातच ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन गेल्यानंतर हा तपास थांबवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Mahadev Munde Murder Case
BJP News : मेधा कुलकर्णींच्या लढ्याला यश; भाजपच्या माजी मंत्र्याला मोठा दणका; बँकेवर आरबीआयची कारवाई

तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के काही पोलिस अधिकारी सहभागी असून त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शिवाय या पोलिसांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केल्याचंही धस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची पदोन्नती झाली होती, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली करण्यात आली. ते असते तर असे प्रकार घडले नसते," असंही धस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com