"मी पण वकिल, दोन पावलं पुढची तयारी करुन ठेवलीय..."

Devendra Fadnavis | Pravin Chavan | BJP | Mahavikas Aaghadi : देवेंद्र फडणविस यांनी तयारी करुन ठेवलीय...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ८ मार्च रोजी विधानसभेत खळबळजनक गौप्यस्फोट केला. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात सरकारच्या विरोधकांना कट करुन संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याबाबता पुरावा म्हणून त्यांनी तब्बल १२५ तासांचे रेकॉर्डिंग देखील पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सभागृहात सादर केले. फडणविसांच्या या बॉम्बनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्यापासून त्याच्या सत्यतेबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातील तारखेबाबत प्रश्न विचारले जात आहेत. तसेच त्यात काही छेडछाड केली असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. शिवाय या प्रकरणापासून प्रविण चव्हाण देखील गायब झाले होते. त्यामुळे यामधील सस्पेस्न वाढत गेला होता. अखेरीस आज चव्हाण माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी हे सर्व मॅन्यूपुलेट करण्यात आले आहे. यातील आवाज आपला नाही, असा दावा केला आहे.

Devendra Fadnavis
भिंतीवरील घड्याळाने घात केला अन् फडणवीस यांनी टायमिंग साधले...

चव्हाण पुढे म्हणाले, आपल्याकडे जळगावचा तेजस मोरे नावाचा एक अशिल येत होता. एका प्रकरणात त्याला आपण जामीन मिळवून दिला होता. त्याचे पैसेही त्याच्याकडे बाकी आहेत. तो नेहमी आपल्याकडे येत असे. आपल्याला वस्तू भेट देण्याचे सांगत असे. परंतु त्याला आपण नकार दिला. मात्र एक दिवस त्याने भिंतीवरचे घड्याळ भेट दिले. ते त्याने आपल्या कार्यालयात समोरच्या भिंतीवर बसविले. त्यात कॅमेरा बसवून चित्रीकरण केले असावे. तो जळगाव येथील असल्याने त्याला मॅनेज केले असावे असे आपणास वाटते, असा दावाही त्यांनी केला.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणविसांना पोलिसांनी बोलावले! उद्या सकाळी लावणार हजेरी...

या सगळ्यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणविस म्हणाले, प्रवीण चव्हाण हे वकील आहेत तसा मी ही वकील आहे. ते काय ऑब्जेक्शन घेणार हे मला आधीच माहित होते. त्यामुळे मी दोन पावलं पुढे असून चव्हाण यांच्या व्हिडीओबाबत मी फॉरेन्सिक रिपोर्ट ही मिळवला आहे. सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि उत्तर मी आधीच पूर्ण केली आहे. तसेच या १२५ तासांच्या रेकॉर्डिंग व्यतिरिक्त प्रवीण चव्हाणांचे आणखीही काही व्हिडीओ माझ्याजवळ आहेत. ही केस सीबीआयकडे गेल्यानंतर मी याबाबतचे सर्व पुरावे त्यांना देणार आहे,'' असाही गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com