Devendra Fadnavis : मोदींनी हिंमत दाखवली अन् मुख्यमंत्री..! फडणवीसांचं जातीपातीच्या राजकारणावर थेट भाष्य

Devendra Fadnavis Comments on Caste Politics in Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात तो (ब्राम्हण) तुमचा मायनस पॉईंट होतो. पण मोदींनी जे काही माझ्यात पाहिले आणि मला बनवले, असे विधान देवेद्र फडणवीस यांनी केले आहे.
Devendra Fadnavis, Narendra Modi
Devendra Fadnavis, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi's Role in Appointing Fadnavis as CM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा 2014 मध्ये शपथ घेतली होती. भाजपमधील नेता पहिल्यांदाच या खुर्चीवर विराजमान झाला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली होती. याबाबत फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध घडामोडींवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदींनी अनेक नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवले आहे. अनेकांनी संधी दिली आहे. तुम्ही त्यांचा पहिला प्रयोग होता, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, हे तर मोदीजीच सांगू शकतात की माझ्यात काय पाहिले. पण हे दाव्याने सांगू शकतो की, महाराष्ट्रात माझ्यासारख्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनविण्याची हिंमत केवळ मोदीजीच दाखवू शकतात.

तुम्हाला महाराष्ट्राचे राजकारण माहिती आहे. 10-11 वर्षांपूर्वी तर राजकारण ज्या वळणावर होते, तेथील जातीय राजकारण आहे, त्यात मी फिट होत नव्हतो. पण पण मोदींनी रिस्क घेतली. त्यावेळी मी पक्षाचा प्रदेशाध्यक्षही होतो. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे सर्वाधिक चर्चेतील नेता म्हणून माझ्याकडे पाहिले जात होते, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis, Narendra Modi
Election Commission : निवडणूक आयोगाकडून 'त्या' अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ; बिहारसाठीही खास भत्ता

तरीही मी समजत होतो की, जे प्रचलित राजकारण आहे, काहीवेळा पदांसाठी जातीकडे पाहणे गरजेचे असते. त्यात मी फिट नव्हतो. त्यामुळे मला संधी मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणात तो (ब्राम्हण) तुमचा मायनस पॉईंट होतो. पण मोदींनी जे काही माझ्यात पाहिले आणि मला बनवले, असे विधान देवेद्र फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis, Narendra Modi
Nitesh Rane : शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी दहशतवादीच! आव्हाडांच्या विधानावर राणेंचा भडका उडाला...

अजितदादांसोबत डील नाही

आपल्यासोबत येण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत कसलीही डील झाली नसल्याचेही विधानही फडणवीसांनी या मुलाखतीत केले. आमच्यासोबत आलात तर सर्व चौकशा बंद होतील, अशी डील झाली आहे का, या प्रश्नावर फडणवीसांनी सांगितले की, अशी कोणतीही डील आम्ही करत नाही. आमच्यासोबत आलेल्यांची न्यायालयीन प्रक्रिया यापुढेही सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com