Dhananjay Munde : 'करुणा शर्मांशी लग्नच नाही, मग बायको कशी?' : पोटगी आदेशाविरोधात मुंडेंचं अपिल

Dhananjay Munde : करूणा शर्मा यांच्या आरोपांतून सुटण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांच्यासोबत भावनिक आणि मानसिक हिंसाचार केल्याचा आरोप मुंडे यांच्यावर सिद्ध झाला आहे.
Dhananjay Munde, Karuna Sharma
Dhananjay Munde, Karuna SharmaSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागवून घेतला होता. त्यानंतर स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या मार्फत मुंडे यांनी राजीनामा पाठवून दिला. या राजीनाम्यानंतर मुंडे यांच्या राजकीय आयुष्यात आलेले वादळ आज काही अंशी शांत होण्याची चिन्हे आहेत.

एका बाजूला या घडामोडी सुरू असताना दुसऱ्या बाजूला मुंडे यांनी नुकतेच करूणा शर्मा यांच्या आरोपांतून सुटण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांच्यासोबत भावनिक आणि मानसिक हिंसाचार केल्याचा आरोप मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सिद्ध झाला आहे. यामुळे त्यांना पोटगी खर्च देण्याचा आदेशही दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. याच अंतरिम आदेशाला मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
Santosh Deshmukh Murder : बीड कडकडीत बंद; मुंडे, कराडविरोधात राज्यभर संतापाचा वणवा

आपली पहिली पत्नी असलेल्या करुणा शर्मा यांच्याशी कधीही विवाह केला नाही, असा दावा मुंडे यांनी यात केला आहे. आपला आणि करुणा शर्मा यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे आमच्यात घरगुती संबंध आहेत, हा दंडाधिकाऱ्यांनी काढलेला निष्कर्ष अयोग्य आहे, असे मुंडेंनी अपिलात म्हटले आहे. दंडाधिकाऱ्यांनी सारासार विचार न करताच अंतरिम देखभालीचा खर्च देण्याचा आदेश दिला, असे अपिलात म्हटले आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
Dhananjay Munde Resignation: मोठी बातमी: महायुतीची पहिली 'विकेट' पडली! धनंजय मुंडे यांचा राजीनामा

पक्षाच्या कामानिमित्त करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याशी ओळख झाली. वारंवार झालेल्या भेटीगाठी आणि संवादामुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाले. संमतीने ते संबंध पुढे नेण्यात आले. या संबंधातून दोन मुलांचा जन्म झाला. त्यामुळे अधिकृतरित्या या मुलांना आपले नाव आणि आडनाव वापरण्याची मुभा दिली. करुणा शर्मा यांना आपला आधी एक विवाह झाला आहे, याची माहिती होती. तरीही, त्यांनी स्वेच्छेने नातेसंबंध ठेवले, असेही मुंडे यांनी अपिलात म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com