
Mumbai News: राज्याच्या राजकारणात गुरुवारी वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. गुरुवारी दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अजितदादा व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी व गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेतले जाणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कृषिमंत्री पदासाठी लॉबिंग करीत असल्याचे पुढे आले आहे. कोकाटे यांचा राजीनामा न घेता खाते बदलेले जाणार आहे.
गेल्या आठ दिवसापासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) ऑनलाईन रमी गेम खेळताना आढळले होते त्यामुळे चर्चेत होते. पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात असताना ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाला होता. दरम्यान, हा कोकाटेंच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर मोठा दबाव वाढला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेतले जाणार आहे. त्यामुळे आता वेगवान घडामोडी घडत आहे.
त्यासोबतच कोकाटे यांचे खाते काढून ते खाते क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे अथवा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर वेगवान हालचाली घडत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्य खात्याची जबाबदारी देणार?
दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.