Dhananjay Munde : '.. तर राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो'; 'या' बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Dhananjay Munde case News : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, असा हल्लाबोल करीत मोठे विधान केले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहेत. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट संपेल असे वाटत होते. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या काळात पीकविमा घोटाळा, आणि डीपीडीसीमधील निधीत घोटाळा झाल्याचे म्हटले होते.

करुणा शर्मा यांनी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामुळे धनंजय मुंडें अडचणीत सापडले आहेत. तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, असा हल्लाबोल करीत राष्ट्रवादी शरद पवार (sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

Dhananjay Munde
Eknath Shinde: सरनाईकांचं अध्यक्षपद हे झालं एक कारण, पण शिंदेंची नाराजी दूर करणं इतकं सोपं थोडंय; फडणवीसांचीही कसोटी लागणार?

राज्यात आता पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते, हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कदाचित शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसते, असे जयंत पाटील (Jayant patil) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Dhananjay Munde
Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहात माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, राजीनामा देऊन पाच दिवस झाले त्यांनी अजूनही त्यावर बोलले नाहीत. त्यामुळे हा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही. येत्या काळात जर या प्रकरणात पोलिसांना धागेदोरे सापडले तर ते धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकतात. मला माहित नाही की पोलिसांजवळ काय माहिती आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले

Dhananjay Munde
MLA Suresh Dhas On Dhananjay Munde : सुरेश धस फास आवळणार, दोनशे कोटींच्या घोटाळाप्रकरणी आता ईडीकडे तक्रार करणार!

यावेळी जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीच्या बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनात येत्या काळात कुठल्या रणनीतीचा वापर करायचे हे ठरेल, असेही यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Dhananjay Munde
Shivsena UBT : येणार येणार साहेब नक्की येणार, पण तारीख नाही सांगणार! ठाकरेंचा पुणे दौरा वेटिंगवर, शिवसैनिकांचा जीव टांगणीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com