Dhananjay Munde Meet CM Fadnavis : मोठी बातमी! धनंजय मुंडे, अजित पवारांनी घेतली मु्ख्यमंत्री फडणवीसांची भेट, डीजीपी रश्मी शुक्लाही उपस्थित

Dhananjay Munde Rashmi Shukla Ajit Pawar : धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
Dhananjay Munde  Ajit Pawar CM fadnavis
Dhananjay Munde Ajit Pawar CM fadnavissarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : नागपूर हिवाळी अधिवेशनाचे पहिल्याद दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षाकडून मुंडे यांना सातत्याने टार्गेट केले जात होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंडेंनी आपल्याला मारण्यासाठी अडीच कोटी तिघांना दिले होते, असे आरोप केले होते. मुंडेंना क्लिन चिट मिळावी म्हणून ते अजित पवारांकडे विनंती करत असल्याचेही जरांगे म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी सांगताना ही भेट आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्यासंदर्भात होती असे सांगितले. ते म्हणाले मी एक लाख 40 हजारांनी निवडून आलो आहे. माझी जबाबदारी आहे की नाही. बीडच्या संदर्भातील कामं होती त्यासाठी मुख्यंत्र्यांना पत्र दिले आहे. आता आशा करतो की कामं होतील.

Dhananjay Munde  Ajit Pawar CM fadnavis
Parliament Session Live : संसदेत मेधा कुलकर्णी यांनीच केली सरकारची पोलखोल; शिवाजी महाराजांच्या गडांसह शनिवारवाड्याचा उल्लेख करत मांडला महत्वाचा मुद्दा...

'त्या' प्रकरणावर बोलणार नाही...

धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणी मी बोलणार नाही. एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. मागील एक वर्षापासून मला टार्गेट करण्यात येत आहे. का करण्यात येत आहे याचा विचार पत्रकारांनी देखील करायला हवा.

Dhananjay Munde  Ajit Pawar CM fadnavis
Bhaskar Jadhav : 'ऑपरेशन टायगर' अ‍ॅक्टिव्ह! भास्कर जाधवांनी घेतली एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याची भेट; प्रताप सरनाईकांनी काय घडलं ते सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com