Bjp News : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या बड्या नेत्याने दिले 'हे' मोठे संकेत

BJP leader statement : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला २४ दिवस पूर्ण झाले असले तरी फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला 24 दिवस पूर्ण झाले असले तरी फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या कोठडीत करण्यात आली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गुरुवारी एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल झाले आहे. त्या पथकांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. दुसरीकडे फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत तर मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde)राजीनाम्याची मागणी केली जात असताना आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder case : एसआयटीचे पथक ॲक्शन मोडवर; केजमध्ये दाखल होताच उचलले मोठे पाऊल

विरोधकांकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता विखे-पाटील म्हणाले, एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्यात. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची लिंक काय? यापूर्वीच्या 15 गुन्ह्यांमध्ये काय कारवाई होणार

त्यातच प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाशी माझा कसलाच संबंध नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोप मुंडे यांनी यावेळी फेटाळून लावले.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case : बीड सरपंच हत्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले,'आज बोललो तर कुणाचीतरी बदनामी...'

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुरुवारी एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल झाले आहे. पथकाचे प्रमुख बसवराज तेली हे केजला पोहोचले असून ते या ठिकाणी सुरु असलेल्या तपासाचा आढावा घेणार आहेत. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तेली घेणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुख व एसआयटीचे इतर अधिकारी यांच्यात केज येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा केली.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; पथकाकडून 150 जणांची चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com