Vijay Wadettiwar News : गतिमान कसलं? हे तर महायुतीचे दिशाहीन सरकार; विजय वडेट्टीवारांची टीका

Political News : जनतेच्या समस्या काय ? नेमकी काय काम आहे आणि काय काम करायचं याच भान नसल्यामुळे असे दिशाहीन नेते दिशाहीन निर्णय घेत आहेत, अशी टीका त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागण्याची शक्यता आहे. बुधवारी पितृपक्ष संपल्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

महायुती सरकारमध्ये मंत्री होऊ न शकलेले भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी एसटी महामंडळाची जबाबदारी स्वीकारल्यावर पहिला निर्णय घेतला तो ‘शिवनेरी सुंदरी‘ चा. येथे एसटी बसची अवस्था खराब आहे. बसमधील छप्पर तुटले, बसमधून पाऊस आल्यानंतर कधी पाणी गळती होते, बस बंद पडतात, बस स्टँडवर महिलांना चांगली स्वच्छतागृह नाही हे सर्व प्रश्न सोडून यांनी निर्णय घेतला काय तर बस सुंदरीचा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

जनतेच्या समस्या काय ? नेमकी काय काम आहे आणि काय काम करायचं याच भान नसल्यामुळे असे दिशाहीन नेते दिशाहीन निर्णय घेत आहेत, अशी टीका त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar
Congress News : काँग्रेसचं जागावाटप कधी? विजय वडेट्टीवारांनी थेट तारीखच सांगितली

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा जागा वाटपाचा मुहूर्त सांगून टाकला. आठ, नऊ आणि दहा ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या सलग बैठका आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांचे घोषणेकडे लक्ष लागले आहे.

वडेट्टीवार म्हणाले, जागा वाटपात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. नवरात्रीमध्ये अधिकाधिक उमेदवारांची नावे आम्ही घोषित करणार आहोत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहेत. काही थोड्या थोड्या जागांवर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे दावे आहेत. त्यासाठी आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान मॅरेथॉन बैठका घेऊन वाद निकाली काढले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
Rohit Pawar : आमदार पवारांनी सरकारला विनंती केली; सरकार किती मनावर घेणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com