Eknath Shinde statement : किमान अभ्यास तरी करा; नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Maharashtra politics latest News : किमान अभ्यास तरी करा, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद काय मग घटनाबाह्य होते का? असा सवालही त्यांनी केला.
Eknath Shinde announces Taloda City adoption
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur news : नागपूरमध्ये सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानावर बहिष्कार घातला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. किमान अभ्यास तरी करा, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद काय मग घटनाबाह्य होते का? असा सवालही त्यांनी केला.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. आमचा अजेंडा खुर्चीसाठी नाही. आम्ही काम करणारे आहोत, ते स्पीडब्रेकरवाले आहेत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. त्यांनी काही बोध घेतला पाहिजे. नुसती जळजळ मळमळ आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा घटनाबाह्य म्हणायचे, आता पण तेच सुरु आहे. किमान अभ्यास तरी करा असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी (Ekanth shinde) उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद काय मग घटनाबाह्य होतं का? असा सवालही त्यांनी केला.

Eknath Shinde announces Taloda City adoption
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

विरोधी पक्ष या अधिवेशनात किती विदर्भातले प्रश्न उपस्थित करतो माहिती नाही. मात्र, आमची तयारी आहे. आरोग्य, सिंचन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देऊ असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना गांभीर्याने घेऊ नका. लोकशाहीत मानसन्मान ठेवणारे आम्ही आहोत. विरोधी पक्ष नेता द्या, असे विरोधक म्हणत आहेत. पण ते अधिकार विधानसभा अध्यक्ष व सभापतींचे आहेत. लोकसभेत गेल्या वेळेस देखील विरोधी पक्ष नेता नव्हता. अडीच वर्षात अनेक कामे आम्ही केली आणि त्यामुळे मोठा विजय मिळाला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde announces Taloda City adoption
Devendra Fadnavis Warning : 'फडणवीसांच्या इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात', शिंदेंच्या आमदाराने फोडला बॉम्ब! 2022 चा इतिहास सांगत भाजपला दिला थेट इशारा!

सध्या राज्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ दिसतोय. त्यांची अवस्था आपण पाहातोय. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात कुठेच महाविकास आघाडी देखील दिसली नाही. त्यांचे नेते घरात होते, कार्यकर्त्यांची निवडणूक होती. आम्ही काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो. महायुतीला 70 ते 75 टक्के यश मिळेल अशी परिस्थिती असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde announces Taloda City adoption
Sushma Andhare Video : 'नरेंद्र मोदींचा जीव काँग्रेसने वाचवला, नाहीतर पांगुळगाडा...', सुषमा अंधारेंचा रवींद्र चव्हाणांवर पलटवार

त्यासोबतच विरोधकांना जळीस्थळी काष्टीपाशाणी फक्त एकनाथ शिंदे दिसत आहे. उद्यापासून नागरपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. सत्ताधारी पक्ष देखील समस्यांना आणि विकासाला न्याय देईल. बहिष्कारावर मी काही बोलू इच्छित नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde announces Taloda City adoption
Sandeep Gaikwad NCP claim : दीपालीच्या मृत्यू प्रकरणातील माजी नगरसेवक गायकवाड कोणाचा? भाजपचा की, राष्ट्रवादीचा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com