

Disha Salian Death Case: दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या आमदार नितेश राणे यांचे त्यांच्या वरिष्ठांनी चांगलेच कान टोचले आहेत. पुराव्याशिवाय या प्रकरणात काहीही बोलू नका अशा शब्दांत त्यांनी राणेंसह इतरांना तंबी दिली आहे. कालच उद्धव ठाकरेंनी याप्रकरणात आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या राजकीय आरोपांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपकडून सावध भूमिका घेतली जात आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं या प्रकरणात पहिल्यांदाच एफआयआर दाखल केला आहे. अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिशाचे वडील सतीश सालियान यांनी यासंदर्भात जबाब दिला आहे. या जबाबात त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. त्यांची सत्ता असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी २०२० मध्ये दिशा सालियानच्या मृत्यू झाल्यापासून आत्तापर्यंत सातत्यानं आदित्य ठाकरेंचं यामागे कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात नुकतेच आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना आपण दिशा सालियानला ओळखतही नाही तिच्याशी आपली कधी भेटही झाली नव्हती असा दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी यामध्ये जर कोणी राजकीय फायद्यासाठी मुलगा आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असेल तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला आहे.
त्यानंतर आता मीडिया रिपोर्टनुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिशा सालियान प्रकरणात आपल्या नेत्यांचे कान टोचले आहेत. त्यांनी म्हटलं की, "प्रत्येक कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं सगळ्यांनीच आपण काय बोलावं आणि काय सांगाव? याकडं लक्ष द्यावं. पुराव्याअभावी कधी बोलू नये. या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला माहिती नाही, किंवा त्याचे पुरावे आपल्याकडं नाही त्यावर आपण बोलता कामा नये"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.