Phaltan doctor death Case : हत्या की आत्महत्या? फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी CM फडणवीसांचा विधानसभेत सर्वात मोठा खुसाला...

Devendra Fadnavis on Phaltan doctor death Case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्याचं हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहित या तरुणीने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.
Devendra Fadnavis on phaltan doctor Death case
Police officials investigating the hotel room where the young doctor died by Death , as forensic reports confirm her handwritten note. doctor Death caseSarkarnama
Published on
Updated on

Phaltan doctor death case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्याचं हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहित या तरुणीने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.

या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण देखील तापलं होतं. अशातच आता आज या आत्महत्या प्रकरणावर राज्याच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतच्या फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे मृत महिला डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर हे तिचंच असल्याचं समोर आल्याचं सांगितलं.

शिवाय ही आत्महत्या गळफास लावून झाली आहे ती गळा दाबून झाली नसल्याचं स्पष्ट केलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे समाजात दुखाची लाट पसरली. त्यानंतर आपण एसआयटी नेमली आणि न्यायाधिशांची चौकशी समिती देखील नेमली आहे.

Devendra Fadnavis on phaltan doctor Death case
Ambadas Danve : ठाकरेंच्या शिलेदाराने ऐन अधिवेशनाच्या काळात टाकला 'कॅश बॉम्ब'; आमदाराचा पैशांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'शिंदेजी हे आमदार कोण...'

आतापर्यंतच्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टप्रमाणे तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच असल्याचा रिपोर्ट आला आहे. आरोपींनी दबाव आणला हे खरं आहे. या केसमध्ये पोलीस अधिकारी बदनेचे चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार तिची फसवणूक करून शाररीक शोषण केल्याचं लक्षात येत आहे. मृत डॉक्टरला लग्नाचं आमिष दाखवल्याचंही लक्षात येत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

शिवाय यावेळी त्यांनी मृत महिला मेडिकल ऑफिसर असल्यामुळे ज्यावेळी आरोपीला अटक होते. तेव्हा तो अटकेसाठी फिट आहे की नाही, यासाठी त्या रिपोर्ट द्यायच्या. काही वेळा त्यांनी अनफिट सर्टिफिकेट दिलं म्हणून पोलिसांनी एक पत्र वरिष्ठांना लिहिलं, ज्यामध्ये अत्यंत गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगारांना अनफिटचं रिपोर्ट दिले जात आहेत, अशी तक्रार केली होती. त्यानंतर तिनेही एक पत्र दिलं होतं. मात्र, हे जुनं प्रकरण आहे.

Devendra Fadnavis on phaltan doctor Death case
Navjot Kaur Sidhu : 500 कोटींचं 'ते' वक्तव्य नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला भोवलं, काँग्रेसने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

त्यानंतरच्या काळात बदनेने फसवणूक केल्यामुळे तिने दोघांचं नाव लिहून आत्महत्या केली. आतापर्यंत्या तपासात तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तिचा गळा दाबून हत्या झाली नाही. शिवाय सुसाईट नोटमधील अक्षर तिचंच आहे. या दोन गोष्टी तपासात समोर आल्या आहेत. या प्रकरणी चार्जशीट लवकरच दाखल होईल. या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशी करण्यासाठी न्याय‍धीशांची नेमणूक देखीलकरण्यात आली आहे, असं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com