Ambadas Danve : ठाकरेंच्या शिलेदाराने ऐन अधिवेशनाच्या काळात टाकला 'कॅश बॉम्ब'; आमदाराचा पैशांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'शिंदेजी हे आमदार कोण...'

Ambadas Danve Share Video MLA Cash Bundle Controversy : अंबादास दानवेंनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख करत हे आमदार कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे व्हिडिओतील आमदार हा भाजप किंवा शिदेंच्या शिवसेनेतील आहे का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.
Ambadas Danve Cash Bomb
A still from the viral video shared by Ambadas Danve shows a man holding bundles of cash, triggering major political discussions. The controversy has intensified Maharashtra politics.
Published on
Updated on

Ambadas Danve Cash Bomb : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीकडे काही पैशांचे बंडल असल्याचं दिसत आहे.

तर हा पैशांचे बंडल घेतलेला व्यक्ती एक आमदार असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एकूण तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?'

Ambadas Danve Cash Bomb
BJP Politics : भास्कर जाधव नाही, काँग्रेसच्या 'या' नेत्याला विरोधीपक्ष नेतेपद! भाजपच्या खेळीने मविआत फूट?

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख करत हे आमदार कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे व्हिडिओतील आमदार हा भाजप किंवा शिदेंच्या शिवसेनेतील आहे का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

Ambadas Danve Cash Bomb
Navjot Kaur Sidhu : 500 कोटींचं 'ते' वक्तव्य नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला भोवलं, काँग्रेसने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

मात्र, ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात दानवेंनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करायला विरोधकांना मुद्दा मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवर सत्ताधारी नेते काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आमदारांना आणि पक्षाला बदमान करणं हे दानेवेंचं काम आहे. त्यांनी पुरावे असतील तर ते सादर करावे त्याच्याशी माझा काही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन, असं मोठं वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केलं आहे. शिवाय विधीमंडळात मी हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही दळवी यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com