Anand Nadkarni Passes Away : मानसोपचार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांचे निधन

Anand Nadkarni Psychiatrist IPH : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
Anand Nadkarni Passes Away
Anand Nadkarni Passes Away sarkarnama
Published on
Updated on

Anand Nadkarni News : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज मुंबईत येथे निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज (शुक्रवारी) पहाटे मुंबईतील निवासस्थानी त्यांची निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.

मानसिक आजार हा इतर आजारासारखा समान्य बाब आहे, असे सांगत त्यांनी मानसिक आरोग्य आणि मानसोपचार याविषयी त्यांनी जागरुकता निर्माण केली. मानसिक आरोग्याविषयी त्यांनी विपूल लेखन केले. 'शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही त्यांनी लेखन केले. 1980 मध्ये एम.बी.बी.एस आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदवी मिळवली. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेची औपचारिक स्थापना झाली. तीच एक शाखा पुण्यातील कर्वेनगर येथे देखील कार्यरत आहे.

Anand Nadkarni Passes Away
Ushadevi Jagdale Passes Away : माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांना मातृशोक!

आनंद नाडकर्णी यांचे लेखण

आम्ही जगतो बेफाम (नाटक), असेच आम्ही सारे (नाटक) आरोग्याचा अर्थ

एका सायकिॲट्रिस्टची डायरी. कर्मधर्मसंयोग : मर्म सात्त्विक जीवनविकासाचे

किंचित. गद्धेपंचविशी, गेट वेल सून, जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक),त्या तिघांची गोष्ट, देवराईच्या सावलीत, मयसभा (नाटक), माझं प्रिस्क्रिप्शन

मितुले आणि रसाळ, मुक्तिपत्रे, रंग माझा वेगळा (नाटक), विषादयोग - ताण तणावांचे नियोजन, वैद्यकसत्ता, शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट (आत्मचरित्र), स्वभाव-विभाव, हेही दिवस जातील.

Anand Nadkarni Passes Away
Illegal Sonography Racket : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण तापलं; 'पुणे कनेक्शन'सह गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरांची संख्या पाचवर, एकूण 16 अटकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com