Ushadevi Jagdale News : दौंड तालुक्यातील पहिला महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. त्यांनी दोन वेळा दौंड तालुक्याचे नेतृ्त्व केले होते. 1972 आणि 1985 मध्ये आमदार म्हणून त्या विजय झाल्या होत्या. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत.
माँसाहेब म्हणून त्या दौंड शहर आणि तालुक्यात परिचित होत्या. त्यांचे पती कृष्णराव जगदाळे यांनी देखील आमदार म्हणून दौंड तालुक्याचे 1980 मध्ये नेतृत्व केले होते. उषादेवी यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून माजी आमदार उषादेवी जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात केली. उषादेवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असून, त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक स्नेहशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “माँ” म्हणून सर्वपरिचित असलेल्या उषादेवी जगदाळे यांनी दोन वेळा आमदार म्हणून दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जनतेची निष्ठेने सेवा केली. जनतेशी असलेली त्यांची आत्मीयता, साधेपणा आणि समाजासाठीची बांधिलकी कायम स्मरणात राहील. पवार कुटुंब आणि जगदाळे कुटुंब यांचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उषादेवींच्या जाण्याने केवळ जगदाळे कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ही पवार कुटुंबासाठीदेखील वैयक्तिक हानी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.