Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शुल्क माफीसाठी 'हे' 5 नियम अनिवार्य

Fee waiver for students in drought affected talukas : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय. शुल्क माफीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या 5 अटी पूर्ण कराव्या लागतील? जाणून घ्या.
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शुल्क माफीसाठी 'हे' 5 नियम अनिवार्य
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. मात्र, या सवलतीचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही. त्यासाठी सरकारने 5 महत्त्वाच्या अटी आणि नियम निश्चित केले आहेत.

नेमका काय आहे सरकारचा निर्णय?

मदत व पुनर्वसन विभागाने 2026 च्या खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. सुरुवातीला 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 304 निश्चित करण्यात आली. या भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याची तरतूद करण्यात आली होती.

Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शुल्क माफीसाठी 'हे' 5 नियम अनिवार्य
महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नावावर शेतजमीन नसेल तरी मिळणार 'हे' सरकारी लाभ

याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांमधील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीसाठी शासनाने एकूण 20,38,630 रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

परीक्षा शुल्क माफीसाठी 'हे' 5 नियम महत्त्वाचे

1. रिपिटर विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ नाही

एकाच परीक्षेला दुसऱ्यांदा बसणाऱ्या किंवा रिपिटर विद्यार्थ्यांना अन्य योजनेतून 100% परीक्षा शुल्क माफी मिळत असेल, तर त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

2. एक्स्टर्नल विद्यार्थ्यांना लाभ नाही

बहिःस्थ म्हणजेच External पद्धतीने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शुल्क माफीसाठी 'हे' 5 नियम अनिवार्य
Police Officer Controversy : अपघातात चार तरुणांचा मृत्यू, त्याच उड्डाणपुलावर महिला पोलिसाचे कारवर बसून बर्थडे सेलिब्रेशन; देसाईंकडन थेट कारवाईचा आदेश

3. पालकांच्या नोकरीबाबत अट

ज्या विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष शहरात राहून नोकरी किंवा व्यवसाय करतात आणि त्यांच्या नावावर गावात शेती आहे, अशा विद्यार्थ्यांना या सवलतीसाठी पात्र ठरवले जाणार नाही.

4. संस्थांकडून प्रस्तावाची तपासणी

संबंधित कला संस्थांना विद्यार्थ्यांचे सविस्तर प्रस्ताव सादर करावे लागतील. या प्रस्तावातील माहिती, पात्रता आणि योजनेचे निकष तपासल्यानंतरच परीक्षा शुल्क माफी मंजूर केली जाईल.

5. MahaDBT योजनेचा लाभ घेतल्यास

MahaDBT पोर्टलवरील अन्य सरकारी योजनांमधून 50% किंवा 100% परीक्षा शुल्क माफी मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थांना द्यावी लागेल. आधीच 50% शुल्क माफी मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना उर्वरित 50% शुल्क माफ केले जाईल. मात्र, 100% लाभ मिळालेल्यांना पुन्हा सवलत मिळणार नाही.

त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी परीक्षा शुल्क माफीसाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या कला संस्थेशी संपर्क साधून या योजनेबाबत माहिती घ्यावी. शासन निर्णयानुसारच अंतिम लाभ निश्चित केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.