Mumbai ED Action : वसईत 'ईडी'चे 16 ठिकाणी छापे; मोठे खुलासे होण्याची चिन्हं

ED Conducts Raids at 16 Locations in Vasai Virar Over Illegal Buildings Case : नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारत प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे.
Mumbai ED Action
Mumbai ED Actionsarkarnama
Published on
Updated on

ED Mumbai raids 2025 : वसई-विरारमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत 16 ठिकाणी छापे घातले. यामध्ये वसई आणि विरार परिसरातील काही प्रमुख वास्तुविशारद तसेच पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी तपास सुरू असून, ही कारवाई दोन दिवसांपासून सुरू आहे.

नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारत प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे. महापालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या विरोधात यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महत्त्वपूर्ण माहिती ईडीला मिळाली. त्याआधारे आता पुढील टप्प्यात कारवाई केली जात आहे. ईडीने यापूर्वी 14 मे रोजी वाय. एस. रेड्डी यांच्या वसई-विरारमधील निवासस्थानी आणि हैदराबाद येथील मालमत्तांवर छापे टाकले होते. त्या वेळी रेड्डी यांच्या घरातून 32 कोटी रुपयांचे बेहिशेबी सोने आणि रोख रक्कम ईडीने ताब्यात घेतली.

या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांचा सखोल तपास करण्यासाठी ईडीने आता वसईतील एकूण 16 ठिकाणी छापे घातले. ही कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरू असून, त्याचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

Mumbai ED Action
ED Action : भाजपमध्ये महाप्रवेश करूनही महाराष्ट्रातील नेत्यावर ईडीची कारवाई सुरुच; तब्बल 44 कोटींची मालमत्ता गोठवली

सूत्रांच्या माहितीनुसार, अनधिकृत इमारतींसाठी परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेत वास्तुविशारदांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. तसेच अनेक ठिकाणी रोख रकमेऐवजी सोन्याच्या स्वरूपात व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहारांचे कनेक्शन रेड्डी यांच्याशी असल्याचा संशय असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर काही वास्तुविशारद देशाबाहेर गेले होते. मात्र, परिस्थिती निवळल्याचे समजून पुन्हा देशात परतले. ईडीच्या या कारवाईमुळे ते पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Mumbai ED Action
Gandhi Family ED Action : गांधी कुटुंबीयांवर संघाच्या सांगण्यावरून 'ED'ची कारवाई - काँग्रेसचा गंभीर आरोप!

वसई-विरारमधील नगररचना विभागातील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ही कारवाई निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com