Gandhi Family ED Action : गांधी कुटुंबीयांवर संघाच्या सांगण्यावरून 'ED'ची कारवाई - काँग्रेसचा गंभीर आरोप!

Congress's Allegations of RSS Influence : EDने ९८ टक्के कारवाया विरोधीपक्षातील नेत्यांच्या विरुद्ध केल्या आहेत. यावरून ईडी कोणासाठी काम करते हे स्पष्ट होते, असंही म्हटलं आहे.
Congress and RSS
Congress and RSSsarkarnama
Published on
Updated on

Congress Accusations : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात EDने आरोपपत्र दाखल केले आहे. यावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. काँग्रेसला संपवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरून हे सर्व केलं जात असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय उपाध्याय यांनी केला. गांधी कुटुंबीयांची प्रतिमा मलीन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठई हा सर्व खटाटोप सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, EDने ९८ टक्के कारवाया विरोधीपक्षातील नेत्यांच्या विरुद्ध केल्या आहेत. यावरून ईडी कोणासाठी काम करते हे स्पष्ट होते. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईनंतर शिक्षा झालेल्यांची संख्या फक्त एक टक्का इतकी आहे. गांधी कुटुंबांची प्रतिमा मलीन करण्यासाठी संघाचे हे षडयंत्र रचण्यात आले आहे.

Congress and RSS
Aditya Thackeray reaction : राज अन् उद्धव ठाकरेंच्या 'साद-प्रतिसादा'वर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

याचबरोबर १९३७ साली पुरुषोत्तम दास टंडन, आचार्य नरेंद्र देव आणि रफी किदवई या स्वातंत्रसैनिकांना सोबत घेऊन पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटीशांच्या विरोधात लढा देण्यासाठी हिंदी आणि ऊर्दू भाषेत नॅशनल हेरॉल्ड वर्तमानपत्र सुरू केले होते. १९४२ साली भारत छोडो आंदोलनाच्यावेळी ब्रिटीशांनी या वर्तमानपत्रावर निर्बंध लादले होते. असोसिएट्‍स जर्नल लिमिटेड नावाने ही पब्लिक लिमिटेड न्युजपेपर कंपनी होती. या कंपनीत गांधी कुटुंब भागधारक आहेत. मात्र ते मालक नाही. असं त्यांनी सांगितलं.

Congress and RSS
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ''...त्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय'' ; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला!

याशिवाय, नियमानुसार ही कंपनी बंद झाल्यास सर्व संपत्ती सरकार जमा होणार आहे. मात्र कंपनीवर गांधी कुटुंबाची मालकी दाखवून सर्व संपत्ती हडप केल्याचे चित्र रंगवल्या जात असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.

Congress and RSS
Ramdas Athawale on Thackeray brothers : ''ठाकरे बंधूंना शुभेच्छा, आता..'' ; आठवलेंचं सूचक विधान अन् नव्या चर्चांना उधाण!

२०२३मध्ये ईडीने कंपनी जप्तीचे आदेश दिले होते. वर्षभर ईडीने आरोपपत्र दाखल केले नाही. नऊ एप्रिलला आरोपपत्र दाखल केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र रिपोर्ट सार्वजनिक केला नाही. काही माध्यमांना तो फक्त देण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत उपाध्याय यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com