
Eknath Khadse Demand do Vote for Rohini Khadse : विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज(सोमवार) सायंकाळी थंडावल्या. राज्यभरात सर्वच मतदारसंघात प्रचाराच्या समारोपाच्या सभा आज जोरदार झाल्या. अनेक उमेदवारांनी आपल्या मतदारांना भावनिक आवाहनही केलं. तर काहींनी मोठ्या घोषणाही केल्या आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पार्टीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली.
यापुढे मी निवडणूक लढणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. याचबरोबर त्यांनी मतदारांना तुम्ही ज्याप्रमाणे मला साथ दिली, तशाच प्रकारे रोहिणी खडसे(Rohini Khadse) यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करून साथ द्या, असं भाविनिक आवाहनही यावेळी केलं. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत.
एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी म्हटले की, 'यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे.'
तसेच, 'तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती.' असं भाविनक आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केलं.
एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नेत्यांशी बिनसल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर मग त्यांना शरद पवारांनी विधानपरिषदेवर संधी दिली. मात्र विशेष म्हणजे यानंतरही एकनाथ खडसे मागील काळात भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर होते, त्यांनी दिल्लीतील भाजप श्रेष्ठींची भेटही घेतली होती. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत काही निर्णय झालाच नाही. अखेर आता कंटाळून त्यांनी राजकीय निवृत्तीचेच संकेत दिले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.