

Jalgaon news : जळगावमधील माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्यात आली असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. 28 सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास ड्रोनने माझ्या फॉर्म हाऊसची रेकी केली. या रेकी करणाऱ्या ड्रोनचे चित्रिकरण देखील करण्यात आले. त्यांच्या वॉचमनने या ड्रोनचे चित्रिकरण केले आहे. या सर्व प्रकाराबाबत त्यांनी संशय व्यक्त केला केला असून या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
28 सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास ड्रोनने त्यांच्या फॉर्म हाऊसची रेकी करण्यात आली. या रेकी करणाऱ्या ड्रोनचे चित्रिकरण देखील करण्यात आले आहे. त्यांच्या वॉचमनने या ड्रोनचं चित्रिकरण केले आहे. संशयास्पद स्थितीमध्ये एक ड्रोन त्यांच्या फॉर्म हाऊस परसिरात फिरत होते. या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील कॉल रेकॉर्ड होत असल्याचा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला होता. माझ्या विरूद्ध फार मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे आरोप करीत या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली आहे.
दहा ते 15 मिनिटे ड्रोन फिरण्याचा प्रकार संशयास्पद वाटतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण प्रत्यक्षात स्थानिक पोलीसांच्या कक्षेच्या बाहेर आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची विशेष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान, यापूर्वी देखील खडसे यांच्या घरी चोरी झाली होती.
यापूर्वीही रश्मी शुल्का यांनी माझा फोन 65 दिवस ट्रॅप केला होता. माझी परवानगी नसताना देखील माझ्या फोनमधील सर्व संभाषण हे रेकॉर्ड करण्यात आले होते. त्या संदर्भात देखील मी तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर चौकशीमध्ये नेमके काय घडले, हे मला अजूनपर्यंत तरी कळाले नाही. हा मला छळण्याचा प्रकार असू शकतो, परंतु या मागे जे काही असेल ते पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.