Uddhav-Raj Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरेंची युती होणार! एकनाथ शिंदे हात जोडत म्हणाले, 'जिंकणार...'

Eknath Shinde MNS Shivsena UBT Alliance : ठाकरे बंधुंच्या युतीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते आपसांत ठरवतील की साथ, प्रतिसाद द्यायचा की नाही ते. आता तरी यावर प्रतिक्रिया देण्यालायक मला काही वाटत नाही.
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde On Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहे.संदेश देण्यापेक्षा थेट बातमी देऊ, असे देखील ते म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये युती होण्यासाठी जोरदार हलचाली सुरू असल्याचे सांगितले जाते.

ठाकरे बंधुंची युती होणार, असे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सांगत आहेत. दरम्यान, या युतीबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडले अन् म्हणाले, महायुती मजबुती लढणार आणि जिंकणार. शिंदे यांनी राज-उद्धव यांच्या युतीबाबत एक शब्दही बोलणे टाळले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे बंधुंच्या युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, यावर प्रतिक्रिया देण्याबाबत माझा काय संबंध येतो त्यात? ते आपसांत ठरवतील की साथ, प्रतिसाद द्यायचा की नाही ते. आता तरी यावर प्रतिक्रिया देण्यालायक मला काही वाटत नाही. त्यामुळे यावर मी योग्यवेळी बोलेन.'

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shubhangi Shinde Suicide Case : बीडच्या शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; भाजपचा बडा नेता फरार

राज ठाकरेंनी बोलवली बैठक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक राज यांचे निवास्थान शिवतीर्थ येथे होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे युतीबाबत संदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव यांनी राज ठाकरेंना फोन करावा

महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हितासाठी मनसे देखीलसोबत जायला तयार आहे. मात्र, मागील अनुभव पाहात आम्ही सावध पावले टाकत आहोत. उद्धव ठाकरेंनी युतीबाबत प्रस्ताव राज ठाकरेंना द्यावा ते त्यावर निर्णय घेतली, असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक फोन करावा. उद्धव यांनी एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे शंभर पावले पुढे टाकतील, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
MLA Dattke : नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा ‘फ्री होल्ड’वरून भाजपमध्ये मतभेद? ; आमदार दटकेंचे थेट मुख्यमंत्री अन् नगरविकास मंत्र्यांना पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com