MLA Dattke : नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा ‘फ्री होल्ड’वरून भाजपमध्ये मतभेद? ; आमदार दटकेंचे थेट मुख्यमंत्री अन् नगरविकास मंत्र्यांना पत्र

Pravin Dattke Nagpur Improvement Trust नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणारी महापालिका जागा फ्री होल्ड करते आणि 'नासुप्र' करीत नाही असे कुठल्या नियमाने होते? असा सवालही आमदार दटके यांनी केला आहे.
Nagpur BJP MLA Vikas Dattke writes directly to the Chief Minister and Urban Development Minister over the freehold land issue,
Nagpur BJP MLA Vikas Dattke writes directly to the Chief Minister and Urban Development Minister over the freehold land issue,sarkarnama
Published on
Updated on

BJP Divided Over Freehold Land Proposal in Nagpur - नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीसाठी आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी आता नागरिकांना विक्री केलेले भूखंड सुधार प्रन्यासने फ्री होल्ड करण्याची मागणी केली. शासनाच्या महसूल विभागाने नझुलच्या जमिनी फ्री होल्ड केल्या, महापालिकेने आपल्या ताब्यातील जागा दोन टक्के निधी आकारून फ्री होल्ड केल्या आहेत. मात्र सुधार प्रन्यासचाच यास विरोध का? असा सवालही त्यांनी केला. या निर्णयावरून राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

भाजप-सेना युतीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीचा निर्णय घेतला होता. आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे यासाठी आग्रही होते. त्यानुसार बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेक फाईली महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. टाऊन प्लानिंगचे अधिकाही हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय फिरवला. पुन्हा नागपूर सुधार प्रन्यासला पुनर्जिवित केले. यामुळे आमदार दटके चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा प्रन्यास बरखास्तीची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात प्रवीण दटके यांनी नागपूर शहरातील दोन नियोजन प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या कार्यपदद्धतीकडे लक्ष वेधलेहे. राज्य सरकार नझुलच्या जागांची मालकी, जनतेला देऊ शकते. महापालिका देऊ शकते मग नासुप्रला काय अडचण आहे. नासुप्र पट्टेवाटप करते मग त्यांना जागा फ्री होल्ड करण्यास अडचण काय आहे? नासुप्र वेगळ्या देशाच्या कायद्यांनी चालते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Nagpur BJP MLA Vikas Dattke writes directly to the Chief Minister and Urban Development Minister over the freehold land issue,
Vijay Mallya on RCB : विजय मल्ल्याने 'RCB'बद्दल केला मोठा खुलासा; २००८ मध्ये संघ खरेदी करण्यामागचं खरं कारणही सांगितलं!

नागपूरच्या जनतेला वेगवेगळे कर भरावे लागतात. त्यांना महापालिकेचा मालमत्ता कर भरावा लागतो, नासुप्रचा भूभाटक कर (ग्राऊंड रेंट) वेगळा भरावा लागतो. अकृषक कर भरावा लागतो. एकाच शहरात दोन दोन नियोजन प्राधिकरणे असल्याने करांचा घोळ आहे. नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणारी महापालिका जागा फ्री होल्ड करते आणि नासुप्र करीत नाही असे कुठल्या नियमाने होते? शहरात नासुप्रची जमीन भाडेपट्टीवर घेतलेले किमान ५० हजार परिवार आहेत. त्यांच्याकडून शासकीय नियमानुसार निधी घेऊन, त्यांचे प्लॉट फ्रीहोल्ड केले तर नागपूरकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा दटके यांनी व्यक्त केली.

Nagpur BJP MLA Vikas Dattke writes directly to the Chief Minister and Urban Development Minister over the freehold land issue,
Dilipkumar Sananda : खामगावात पॉलिटिकल ट्वीस्ट! दिलीपकुमार सानंदा देणार भाजप नेत्यांना पक्षप्रवेश समारंभाचे निमंत्रण

विशेष म्हणजे अलीकडेच राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधार प्रन्यासच्या प्रश्नांवर बैठक घेतली होती. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते. फ्री होल्डच्या विषयावरून बैठकीत मतभेद उफाळून आले होते असे समजते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com