Eknath Shinde Setback : खासदाराच्या दाव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली, मोठा धमाका होणार, 25 टक्के कमिशन...

Eknath Shinde Devendra fadnavis : मंत्री 20 ते 25 टक्के कमिशन घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत मोठा खुलासा करण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडधड वाढणार असल्याची चर्चा आहे. राऊत यांनी सूचक ट्विट करत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीसजी आपल्या सरकार विषयी लोकांत कमालीची नाराजी आहे;आपले मंत्री हे वीस/पंचवीस टक्के कमिशन घेतल्याशिवाय समाजाचे कल्याण करत नाहीत. उद्या…एकनाथ शिंदे

राऊत यांनी शिंदे यांना हे ट्विट टॅग करत त्यांच्या मंत्र्यांविषयी मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे नेमका कोणत्या मंत्र्याविषयी राऊत टक्केवारीचा खुलासा करणार की एकनाथ शिंदे हेच टार्गेटवर असणार अशी चर्चा सुरू आहे.

संजय राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वेगवेगळ्या घोटाळ्यांविषयी त्यांच्याकडे चौकशीची मागणी करत असतात. मात्र, CM देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग केल्याने सस्पेन्स वाढला आहे. राऊत पुराव्यासह खुलासा करणार का? की फक्त आरोप करणार याची देखील चर्चा आहे.

Eknath Shinde
Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप, 'आदिवासींची जमीन...'

नार्वेकरांवर आरोप, कायदेशीर नोटीस देणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आदिवासींची जमीनीवर अतिक्रमण करत त्यांना तेथून हकलले, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. या विषयी थेट त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यावर राहुल नार्वेकर यांनी राऊतांचे आरोप बिनबिडाचे असल्याचे सांगत त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच अब्रुनुकसानीची नोटीस मिळल्यानंतर त्यांना कळेल, असे देखील म्हटले होते.

Eknath Shinde
Eknath Shinde News : एकनाथ शिंदे 'अ‍ॅक्शन मोड'वर, नगराध्यक्षांची बैठक बोलवली, रणनीती ठरणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.