Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदे 'अ‍ॅक्शन मोड'वर, नगराध्यक्षांची बैठक बोलवली, रणनीती ठरणार!

Shivsena Municipal Presidents Meeting : आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नगराध्यक्षांची आज मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाच्या नगराध्यक्षांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

आज दुपारी ही बैठक वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आहे. या बैठकीत शिंदे दुष्काळी भाग, शेतकरी प्रश्न आणि पाणीटंचाईचा आढावा घेणार आहेत.

आगामी निवडणुका, महायुतीमधील वाद, आपसातील मतभेद, पक्षवाढ आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत नगराध्यक्षांच्या सविस्तर चर्चा करणार असल्याचेही सांगितले जाणार आहे. या बैठकीतील चर्चेनंतर शिवसेनेची आगामी रणनीती ठरणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील दुष्काळपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या भागातील दुष्काळाचा आढाव घेत मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्ती एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब विठ्ठल मंदिरात शासकीय पूजा केली.

त्यांनी सांगितले की, यंदा राज्यात भीषण दुष्काळ असल्याने बळीराजा संकटात आहे. त्याच्या पाठीशी शासन आणि शिवसेना देखील ठामपणे उभी असून त्याला दिलासा देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र तरीही यंदाच्या या संकटाची व्याप्ती पाहता ते दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळो एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितले.

Eknath Shinde
Eknath Shinde News : कलेक्टर, एसपींचा सल्ला अन्‌ आमदार राजू खरेंची विनंती; एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय

'त्या' कुटुंबाला मदतीचा हात

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खणताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून घडलेल्या दुर्घटनेमध्ये आबासो घोडके, तानाजी घोडके, सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे या चार मजुरांना आपला जीव गमावावा लागला होता. कार्तिकी एकादशीच्या दिवशी एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आले असता या मजुरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी पाच लाखांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना प्रत्येकी २ लाखांची वैयक्तिक मदत देखील करण्यात आली.

Eknath Shinde
Shivsena News : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 'राडा' प्रकरणात सरकारचा 48 तासांत यू-टर्न! विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती अचानक रद्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.