मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जीव टांगणीला लावणारी घटना

Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर महालक्ष्मीवरून मुरबाडकडे निघाले होते. मात्र कल्याणनजीक वादळी वाऱ्याचा फटका बसला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर महालक्ष्मीवरून मुरबाडकडे निघाले होते. मात्र कल्याणनजीक वादळी वाऱ्याचा फटका बसला. शिंदे यांचे हेलिकॉप्टर या वादळात अडकले होते. मात्र, पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. खराब हवामानामुळे जुहू नजीक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. (बातमी अपडेट होत आहे)

Eknath Shinde
Shiv Sena news : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शिवसेनेकडून लढलो, असे म्हणणाऱ्या आमदाराविरोधात शिंदेसेना आक्रमक; बड्या नेत्याकडून थेट ‘मातीमोल’ची भाषा...

गुरुवारी सायंकाळी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये वादळांसह सुसाट्याचा वारा सुटला होता. यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर तब्बल वीस मिनीटे वादळात घोगावत होते. पायलटने योग्यरित्या हेलिकॉप्टर जुहु या ठिकाणी उतरवले. शिंदे हे, महालक्ष्मीहुन मुरबाडला जात होते. एकनाथ शिंदे यांच्यसोबत असलेले इतरही सुखरुप असल्याचे समोर आले आहे.

Eknath Shinde
Shiv Sena news : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शिवसेनेकडून लढलो, असे म्हणणाऱ्या आमदाराविरोधात शिंदेसेना आक्रमक; बड्या नेत्याकडून थेट ‘मातीमोल’ची भाषा...

कल्याण डोंबिवली परिसरातील वातावरण गुरुवारी अचानक बदलल्याचे पाहयला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याच वादळाचा फटका हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील बसला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकले होतं. मात्र त्यानंतर या हेलिकॉप्टरचं जुहू एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Eknath Shinde
Shivsena UBT : ठाकरेंच्या खासदारांमध्ये फूट अटळ; मात्र ऑपरेशन टायगरसाठी पुरेशी संख्या जमेना?

हेलिकॉप्टरचे यशस्वी लँडिंग

या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी होते. हेलिकॉप्टरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर हे सर्वजण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

Eknath Shinde
Maharashtra Politics Live Update : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com